Water Pollution : तारापुरातील पाण्याचा दर्जा सुधारला

सर्वाधिक प्रदूषण निर्माण करणारी औद्योगिक वसाहत असल्याचा शिक्का पुसण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उद्योजकांची संघटना टिमाने पुढाकार घेतला आहे.
Water Pollution
Water PollutionAgrowon

मनोर ः सर्वाधिक प्रदूषण (Pollution) निर्माण करणारी औद्योगिक वसाहत असल्याचा शिक्का पुसण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) आणि उद्योजकांची संघटना टिमाने पुढाकार घेतला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये राबवलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिमाण दिसू लागले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील (Tarapur Industrial Estate) प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात मोठ्या प्रमाणात यश आले असून प्रक्रिया केंद्रातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे.

Water Pollution
Jat Water Issue : पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जाऊ द्या

साधारण वर्षभरापूर्वी तारापूर औद्योगिक वसाहत प्रदूषणकारी असल्याचा शिक्का पुसण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टिमाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली होती. औद्योगिक वसाहतीच्या एका झोनमध्ये केलेला प्रयोग मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये राबविण्यात आला. त्यामुळे प्रक्रिया केंद्रात येणारे सांडपाण्याचे प्रमाण आणि सीओडी व्हॅल्यू नियंत्रणात येऊन प्रक्रिया करून सोडलेल्या पाण्याचा दर्जा सुधारला.

Water Pollution
Water Supply Scheme : बृहत् बारामती पाणीपुरवठा योजनेस गती

औद्योगिक वसाहतीच्या एका झोनमध्ये केलेला प्रयोग मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण औद्योगिक वसाहती मध्ये राबविण्यात आला. त्यामुळे प्रक्रिया केंद्रात येणारे सांडपाण्याचे प्रमाण आणि सीओडी (केमीकल ऑक्सिजन डीमांड) व्हॅल्यू नियंत्रणात येऊन प्रक्रिया करून सोडलेले पाण्याचा दर्जा सुधारला. सध्याच्या घडीला औद्योगिक वसाहतीमधील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात त्याच्या क्षमता आणि डिझाईन पॅरॅमिटरनुसार सांडपाणी येत आहे. त्यामुळे प्रक्रिया केल्यानंतर सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून बाहेर सोडले जात असलेल्या सांडपाण्यातील पोटेनशिअल हायड्रोजन आणि सीओडी व्हॅल्यू नियंत्रणात आहे.

छुप्या पद्धतीने पाणी सोडणाऱ्यांवर नियंत्रण

सहा नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधून नाल्यात वाहणारे पाणी अडवण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने सोडले जाणारे सांडपाणी नदी नाल्यांमध्ये जाण्यापासून रोखण्यात येणार आहे. बंधाऱ्याच्या सोडलेले सांडपाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्याची ओळख पटवली जाणार असल्याने छुप्या पद्धतीने सांडपाणी सोडणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मानस आहे.

तीन नैसर्गिक नाल्यांची गुणवत्ता चांगली

रात्रीच्या वेळी औद्योगिक वसाहतीमधील नाल्यांमध्ये घातक सांडपाणी सोडण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टिमाच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टिमाच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीची पाहणी करून नैसर्गिक नाल्यांची नोंद घेतली. पाहणीत नऊ नैसर्गिक नाल्यांची नोंद करण्यात आली. तीन नाल्यांमध्ये पाण्याची गुणवत्ता चांगली आढळून आल्याने सहा नाल्यांवर काम करण्याचे निश्चित करण्यात आले.

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या उपप्रादेशिक अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या. त्याला टिमा आणि उद्योजकांनी सहकार्य केल्याने सकारात्मक बदल दिसून येत आहे.
प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार टिमा आणि उद्योजकांनी होकार दर्शवून नियोजन करून सांडपाण्याचा दर्जा सुधारला आहे. टिमाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीमध्ये सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
वेलजी घोगरी, अध्यक्ष, टिमा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com