Agriculture Irrigation : ...अखेर अंजना पळशी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडले

यंदा अंजना पळशी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
Water Project
Water ProjectAgrowon

Aurangabad Irrigation Project : शेतकऱ्यांनी अनेकदा केलेल्या मागणीनंतर अखेर शुक्रवारी अंजना पळशी मध्यम प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे (Canal Irrgation) नाचनवेल परिसरातील चिंचखोरी पाझर तलावाकाठी तसेच आमदाबाद पाझर तलावासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अंजना पळशी मध्यम प्रकल्पाव्यातून (Anjana Palshi Water Project) वाया जाणारे पाणी डावा कालव्याद्वारे पाझर तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या संदर्भात गोदावरी पाटबंधारे महामंडळ (Irrigation Department) व जिल्हाधिकारी यांना अनेकदा निवेदनही देण्यात आले होते.

त्यानुसार यंदा अंजना पळशी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. नाचनवेल चिच खोरी पाझर तलाव २०१० मध्ये डाव्या कालव्यातून पाणी सोडून भरला होता.

त्यामुळे नाचनवेल, आमदाबाद शिवारातील लाभ क्षेत्रातील शेकडो एकर क्षेत्र सिंचनाखाली आली होती. त्याचप्रमाणे यंदाही कालव्यातून पाणी सोडून नाचनवेल चिचखोरी पाझर तलाव व आमदाबाद, पाझर तलाव भरून दिला तर नाचनवेल आमदाबाद, मोहाडी, लाभक्षेत्र शिवारातील शेतजमिनी सिंचनाखाली येईल.

Water Project
Solapur Ujani Canal : कालवा फुटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

रब्बी पिकाला व जनावरांना पिण्यासाठीच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे निवेदनकर्त्या शेतकऱ्यांचे होते. अंजना पळशी डावा कालवा दुरुस्ती करून किमान तीन अवतरण पाणी नियमितपणे मिळावे. यासंबंधीही अनेक वेळा निवेदन दिले आहे.

या कालव्यातून मोठी झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे त्याची सफाई करणे व कालव्याची गळती बंद करणे आदी कामे तातडीने करावीत. जमीन क्षेत्र कमांड एरिया लाभक्षेत्र असल्यामुळे जमीन खरेदी-विक्री जास्तीचा मुद्रांक भुर्दंड बसतो;

मात्र या पाण्याचा लाभ नियमित मिळत नाही त्यामुळे याविषयी तातडीने कार्यवाही करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

तात्पुरती दुरुस्ती करून हे पाणी सोडण्यात आले, असल्याचे नाचणवेलचे उपसरपंच रावसाहेब शिंदे म्हणाले. सध्या नाचणे विल शिवारातील चिच खोरी पाझर तलावात पाणी येणे सुरू, असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com