
नाशिक : यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिला असला तरीही उन्हाचा कडाका वाढला आहे. मार्च महिन्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई (Water Shortage) जाणवते.
त्याला सामोरे जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा जिल्ह्याचा संभाव्य टंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडून (Nashik Zilha Parishad) तयार करण्यात आला आहे.
६ कोटी ६१ लाख ५० हजारांचा हा आराखडा जिल्हाधिकारी प्रशासनास सादर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आराखड्यात करावयाच्या उपाययोजनेबाबत तब्बल २ कोटींनी घट झाली आहे.
पुरेसा पाऊस, १०० टक्के धरणसाठा ( Dam Water Stock) असल्याने ही घट झाली असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा (Water Supply) विभागाकडून जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा बनवला जातो. त्यासाठी पंचायत समितीस्तरावर तालुक्यांच्या आढावा बैठक घेतल्या जातात.
जिल्ह्यात दरवर्षी १००हून अधिक टँकरची गरज भासते. गतवर्षी टंचाईची तीव्रता कमी होती.यंदाही तशीच परिस्थिती राहील, असा अंदाज आहे;
मात्र टँकर मंजूर करून घेणे आवश्यक आहे.त्यासाठी पाणीटंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आला असून तो आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.
यंदा ४१२ गावे, वाडे यावरील टंचाईची शक्यता लक्षात घेऊन ६ कोटी ६१ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, टंचाईची तीव्रता वाढल्यास खासगी विहिरी अधिग्रहीत करणे, विहिरींचे खोलीकरण करणे यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.
मागील वर्षी ८ कोटी ६५ लाखांचा होता आराखडा
गतवर्षी ५७९ गावे, ९२२ वाड्या यासाठी ८ कोटी ६५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या आराखड्यात घट झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयास आराखडा सादर झाला असून, आठवड्यात त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.