
अमरावती : अमरावती विभागातील बहुतांश प्रकल्पांतील जलसाठा (Water Storage) मोठ्या प्रमाणावर वाढला. मोठ्या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला.
प्रकल्पांचे दरवाजे (Water Project) बराच काळ उघडे ठेवावे लागले. मात्र नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यातच या जलसाठ्यात तब्बल २० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
जून ते सप्टेंबर पावसाच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. याच काळात राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला.
१ ऑक्टोबरपासून राज्यात सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक आणि विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यातून सर्वच मोठे प्रकल्प पूर्णपणे भरले. अमरावती विभागातील नळगंगा वगळता अप्पर वर्धा, पूस, अरुणावती, बेंबळा, काटेपूर्णा, वान, पेनटाकळी व खडकपूर्णा हे प्रकल्प पूर्णपणे भरले.
त्यामुळे विसर्ग सोडावा लागला. १४ ऑक्टोबरपासून पावसाने परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २२ ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आणि धरणे पुन्हा काठोकाठ भरली.
यंदा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला अमरावती विभागातील ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांपर्यंत जलसाठा होता. या सर्व प्रकल्पांची एकत्रित प्रकल्पीय क्षमता १३९९.९१ दलघमी आहे.
त्यावेळी १३९० दलघमी इतका जलसाठा होता. सिंचन प्रकल्पातील १०० टक्क्यांवर पोहोचलेला जलसाठा बघता यंदा सिंचन व पाणीपुरवठ्याचा प्रश्न राहणार नाही, अशी शक्यता होती.
मात्र गेल्या दोन महिन्यांतील जलसाठ्यातील घट चिंता वाढवणारी ठरू लागली आहे. रब्बी हंगाम सुरू असल्याने सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. जलसंपदा विभागाने त्यासाठी पाच ते सात पाळ्यांचे नियोजन केले आहे.
मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा स्थिती (दलघमीमध्ये)
धरण - ३ नोव्हेंबर - सद्यःस्थिती
अप्पर वर्धा ५६४ ४५७
पूस ९१.२६ ७४
अरुणावती ३३० १३४
बेंबळा २६८ १२६
काटेपूर्णा ३४७ ६५
वान ४१२ ६९
नळगंगा २९३ ५२
पेनटाकळी ५५८ ५१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.