Rain Update : अकोल्यातील प्रकल्पसाठा ८३ टक्क्यांवर

यंदाच्या मोसमात आजवर झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प तुडुंब भरले आहेत.
Rain Udpate
Rain UdpateAgrowon

अकोला ः यंदाच्या मोसमात आजवर झालेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain Akola) जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प (Water Project In Akola) तुडुंब भरले आहेत. सर्व प्रकल्प मिळून हा साठा ३१० दलघमी बनला असून सुमारे ८३ टक्के झाला आहे. या पाण्यामुळे आता पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme), रब्बीतील सिंचनाचा (Irrigation) मार्ग मोकळा झाला आहे.

Rain Udpate
Irrigation techniques: सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना काय काळजी घ्याल?

यंदाच्या मोसमातील पावसाचे तीन महिने लोटले आहेत. जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने संततधार हजेरी दिली. सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. तर प्रामुख्याने मोठ्या प्रकल्पाच्या क्षेत्रात हा पाऊस पडल्याने साठ्यात वेगाने वाढही झाली. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या काटेपूर्णा या प्रकल्पात ८४.३५ दलघमी साठा झालेला आहे. एकूण क्षमतेच्या ९७.६८ टक्के एवढा हा साठा आहे. वाण प्रकल्पात ६३.७५ दलघमी साठा असून ७७.७९ टक्के आहे.

काटेपूर्णा प्रकल्पाच्या क्षेत्रात मालेगाव तालुक्यात अधिक पाऊस झाल्याने आजवर अनेक वेळा गेट उघडे करून काटेपूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागलेला आहे. अद्याप पावसाचा एक महिना शिल्लक आहे. हे लक्षात घेता वाण प्रकल्पात संपूर्ण साठा जमा होऊ देण्यात आलेला नाही. परतीच्या पावसाने आता हा प्रकल्प पूर्ण भरला जाईल. इतरही प्रकल्पांमध्ये सप्टेंबरच्या पावसाचा साठा तयार होणार आहे. एकूणच जिल्ह्यातील प्रकल्प यंदा पावसाच्या पहिल्या तीन महिन्यातच तुडुंब भरून वाहत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com