Water Tax: पाणीपट्टी परतावा विनाविलंब मिळावा

वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेने पारदर्शक कामकाज करून आदर्श निर्माण केला आहे. संस्थेने २०२१-२२ यावर्षीच्या पाणीपट्टीचा भरणा तीन महिन्यांपूर्वीच केला; मात्र, शासनाकडून परतावा मिळालेला नाही.
Water Tax
Water TaxAgrowon

नाशिक ः वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेने पारदर्शक कामकाज करून आदर्श निर्माण केला आहे. संस्थेने २०२१-२२ यावर्षीच्या पाणीपट्टीचा (Water Tax) भरणा तीन महिन्यांपूर्वीच केला; मात्र, शासनाकडून परतावा (Refund) मिळालेला नाही. या रकमेतून संस्था लाभक्षेत्रातील चाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करीत असल्याने हा परतावा विनाविलंब रब्बी हंगामपूर्व (Rabi Season) प्रस्तावित कामांसाठी मिळणे आवश्यक आहे.

Water Tax
Water Resources : ‘वाल्मी’ संस्थेचा उदय आणि अस्त कसा झाला ?

या अनुषंगाणे तो विनाविलंब प्रत्येकवेळी पाणीपट्टी भरल्यानंतर परतावा एक महिन्याच्या आत मिळाल्यास संस्थांना बळकटी येईल, अशी मागणी वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागणी केली.

वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष अरुण घुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी जलसंपदा विभागाचे उपअभियंता हर्षद देवरे, शाखाधिकारी शुभम भालके, दीपक नरोटे, ऋषिकेश भंडारी, समाज परिवर्तन केंद्राचे लक्ष्मीकांत वाघवकर आदी उपस्थित होते. सभेत संस्थेचे सचिव बाळासाहेब कदम यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.

Water Tax
Ground Water Level : भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत वाढ

संस्था कार्यान्वित झाल्यापासून संस्था शासनात नियमित भरणा करीत असल्याने ५ टक्के जादा परतावा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणी सभासदांनी केली. वार्षिक सभेत विविध पाणीवापर संस्थांच्या सदस्यांनी कामकाजाबद्दल प्रश्न उपस्थित केले. अध्यक्ष श्री. घुमरे, ज्येष्ठ संचालक शहाजी सोमवंशी उत्तरे देत सर्वांचे समाधान केले.

अतिवृष्टीमुळे वाघाड कालव्याची दुरुस्ती रब्बी हंगामाचे आवर्तन मिळण्याअगोदर करावी, अशी मुख्य मागणीदेखील केली. त्यास उपअभियंता देवरे यांनी होकार देत रब्बी हंगामापूर्वी दुरुस्ती करून देण्याचे या वेळी मान्य केले. सभेस उपाध्यक्ष बाजीराव शिंदे, सागर पगारे, शिवाजी पिंगळ, रघुनाथ पाटील, गोवर्धन कुलकर्णी, रामनाथ पिंगळ, संचालिका चंद्रकला वडजे यांच्यासह सर्व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक (मविप्र) संस्थेचे नूतन सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संचालक प्रवीण जाधव यांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला. ॲड. ठाकरे यांनी वाघाड प्रकल्पीय पाणीवापर संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

ज्या पाणीवापर संस्था पाणीपट्टी वेळेवर किंवा मुदतपूर्व भरतील, अशा पाणीवापर संस्थांना परताव्याच्या रकमेत ५ टक्के परतावा वाढवून देण्याच्या शासन निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे संघास ५ तक्के वाढवून देण्याची मागणी आहे. त्यानुसार शासनाने वाढवून द्यावी व लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी.
लक्ष्मीकांत वाघावकर, संचालक, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com