Watermelon Farming : सिंधुदुर्गात शेकडो टन कलिंगडे शेतातच पडून

मागणीपेक्षा जास्त उत्पादन आणि गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आलेला माल यामुळे कलिंगडांच्या दरात मोठी घसरण झाली.
watermelon
watermelon Agrowon

Watermelon Production सिंधुदुर्गनगरी : मागणीपेक्षा जास्त उत्पादन (Watermelon) आणि गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आलेला माल यामुळे कलिंगडांच्या दरात (Watermelon Rate) मोठी घसरण झाली. शेकडो टन कलिंगडं शेतातच पडून आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कलिंगड उत्पादक (Watermelon Farmer) आर्थिक संकटात सापडले असून भविष्यात कलिंगड लागवडीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.

२०२० मध्ये कोरोनामुळे हजारो टन माल शेतातच सडला. कलिंगड उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे २०२१ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केली नाही. २०२२ मध्येदेखील कोरोनाच्या संभाव्य शक्यतेने अनेकांनी कलिंगड लागवड केली नाही. परंतु ज्या काही मोजक्या शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केली.

watermelon
Watermelon Cultivation : कलिंगड, खरबूज लागवडीला प्रारंभ

त्यांना विक्रमी प्रति किलो १८ ते २० रुपयांपर्यत दर मिळाला. अनेक उत्पादक शेतकऱ्यांना कलिंगड लागवडीतून चांगला नफा झाला. हंगामाच्या अखेरपर्यंत प्रति किलो १२ ते १४ रुपयांपर्यंत दर मिळाला.

त्यामुळे गेल्या वर्षी चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षीदेखील चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेकडो शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केली. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लागवडीचे प्रमाण सर्वाधिक राहिले.

watermelon
Watermelon Cultivation : कलिंगडाची लागवड कशी कराल?

त्या कालावधीतील उत्पादन मागील वीस दिवसांपासून सुरू झाले आहे. मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली, या तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध जातींचा शेकडो टन माल एकाच वेळी परिपक्व झाल्यामुळे आणि त्याच वेळी कलिंगडाकरिता मोठी बाजारपेठ असलेल्या गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधील कलिंगडं मोठ्या प्रमाणात आली. त्यामुळे कलिंगडाचा दर घसरला.

watermelon
Watermelon Cultivation : खडकाळ, मुरमाड जमिनीत बहरली रंगीत कलिंगडे

हा दर सध्या पाच ते सहा रुपयांपर्यंत घसरला आहे. परंतु त्या दरानेदेखील व्यापारी कलिंगड खरेदी करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच सडत आहे. शेतकऱ्यांशी करार केलेले व्यापारी काही प्रमाणात त्या-त्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहेत.

परंतु ज्या शेतकऱ्यांचा करार नाही त्यांचा माल मात्र शेतातच कुजत असल्याचे चित्र आहे. कलिंगडाला साधारणपणे प्रति किलो चार ते पाच रुपये उत्पादन खर्च येतो. परंतु त्या दरानेदेखील कलिंगड खरेदी करण्यास कुणी तयार होत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

मी दोन एकरामध्ये कलिंगड लागवड केली होती. माझ्याकडे सुमारे २० टन माल होता. उत्पादन खर्चाइतकादेखील दर देण्यास कुणी व्यापारी तयार नाही. त्यामुळे सर्व माल शेतातच पडून आहे. माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

- विश्वंभर परब, कलिंगड उत्पादक शेतकरी, वराड, ता. मालवण

एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत आला. याशिवाय गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कलिंगडं आल्यामुळे दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वेळी लागवड न करता टप्प्याटप्प्याने करणे आवश्यक आहे.

- दीपक कासोटे, कलिंगड उत्पादक शेतकरी, गडमठ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com