संभाजीराजेंच्या खासदारकीसाठी विनंती केली होती; थोरात

राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली असली तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे संभाजीराजे महाराज यांना सर्वांनी मिळून खासदार करावे, अशी आमची इच्छा होती. मात्र जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचा निर्णय त्यांनी घेतला.
Chatrapati Sambhaji Raje
Chatrapati Sambhaji RajeAgrowon

अहमदनगरः ‘‘राज्यसभेची सहावी जागा ही शिवसेनेला गेलेली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे संभाजीराजे यांना जागा द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्याना केली होती. मात्र ती जागा शिवसेनेला गेली असल्याने त्यांनी निर्णय घ्यायचा होता. त्यांनी निर्णय घेतला,’’ असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

नगर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली असली तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे संभाजीराजे महाराज यांना सर्वांनी मिळून खासदार करावे, अशी आमची इच्छा होती. मात्र जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचा निर्णय त्यांनी घेतला.

राणा दांपत्याला उद्देशून थोरात म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री हे पद सर्व पक्षांचे आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला जातो. तसा महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा आहे. मात्र महाराष्ट्रात अशी जोडी आहे की ते मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरते.

‘‘एका पक्षाचे सरकार असले तरी प्रश्‍न येतच असतात. आमदारांवर कामांसाठी जनतेचा दबाव असतो. काँग्रेस पक्षाच्या आमदारांना कमी निधी मिळाला, अशा तक्रारी आहेत. त्यांना निधी मिळाला पाहिजे, समान वागणूक मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे थोरात म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com