Sangli News : मुख्यमंत्र्यांच्या तरे गावात बांधावर आंदोलन करू

Sugarcane Production Update : ऊस वाहतूकदार वाहनचालकांची मुकादमांकडून होणारी फसवणूक आता थांबली पाहिजे. त्यासाठी धोरण ठरविले पाहिजे आणि ज्यांनी फसवणूक केली, त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon

Sangli News : ‘ऊस वाहतूकदार वाहनचालकांची मुकादमांकडून होणारी फसवणूक आता थांबली पाहिजे. त्यासाठी धोरण ठरविले पाहिजे आणि ज्यांनी फसवणूक केली, त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

यासाठी प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तरे गावातील शेताच्या बांधावर ठिय्या मारू,’’ असा इशारा स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेने दिला आहे. ‘तेथे खर्डा-भाकरी खाऊन व्यवस्थेचे लक्ष वेधू’, असेही संघटनेने म्हटले आहे.

Sugarcane Crushing Season
Eknath Shinde : पीक नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे महामेळावा झाल्यानंतर संघटना अधिक आक्रमक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी आणि सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली धोरण ठरेपर्यंत आंदोलन आक्रमक करत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Sugarcane Crushing Season
Eknath Shinde : मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांकडून जाणूण घेणार शेतीचे प्रश्‍न

शेट्टी म्हणाले, ‘‘गत वर्षी राज्यात दहा हजार २५८ मुकादमांनी वाहनधारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. कारखानदार त्याविरोधात ऊस वाहतूकदारांना साथ देणार नसतील तर वाहतूकदारही ‘असहकार’ पुकारतील.’’

पवार म्हणाले, ‘‘शेंडी तुटे वा पारंबी, आता धोरण ठरल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही. कायदा करा, नियम करा आणि त्याची कडक अंमलबजावणी करा, एवढीच आम्ही मागणी केली आहे.

राज्यभरात अनेक मुकादम बड्या नेत्यांचे संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना आश्रय दिला जात आहे. त्यात शेतकऱ्यांची पोरे उद्‍ध्वस्त होत आहेत. पोलिसांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. कोल्हापूरमध्ये त्याची सुरवात झाली आहे. सांगली पोलिसांनी त्याची लवकर दखल घ्यावी.’’

वाहतूकदारांचे नुकसान होण्यास कारखान्यांची शेती कार्यालये तेवढीच जबाबदार आहेत. याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या गावी ३१ जून रोजी आम्ही जात आहोत. त्यांच्या शेताच्या बांधावर बसून ठिय्या आंदोलन करू. तेथेच खर्डा भाकरी खाऊ.
- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com