मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू

बाळासाहेब थोरात; पुणतांबा येथील आंदोलनाला भेट
मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू
Puntamba Farmer ProtestAgrowon

नगर : ‘‘पुणतांबा (Puntamba Farmer Protest) येथील आंदोलनकर्त्यांनी मांडलेले प्रश्न, मुद्दे राज्य शासनाशी निगडित आहेत. राज्य मंत्रिमंडळामध्ये हे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी आग्रह धरू,’’ असे आश्‍वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी दिले. ‘‘काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी हिताची भूमिका घेत असून शेतकरी प्रश्न (Framers Issue) सुटले पाहिजेत, असे आम्हालाही वाटते,’’ अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मांडली.

राहता तालुक्यातील पुणतांबा येथे बुधवारपासून (ता.१) शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला थोरात आणि पटोले यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.

Puntamba Farmer Protest
किसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा येथून प्रारंभ 

थोरात म्हणाले, ‘‘पुणतांबा गावातील ग्रामस्थांनी ज्या शेतकरी प्रश्नावर आंदोलन सुरू केले आहे, ते जवळपास सर्व प्रश्न राज्य शासनाशी निगडित आहेत. हे प्रश्न सुटावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, ही काँग्रेसची भूमिका आहे. शक्य झाले तर संगमनेरला या, तेथे चर्चा करू. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या साठी कांदा, गहू, साखर निर्यातही सुरू राहिली पाहिजे. त्यामुळे पैसा खेळता राहतो.’’

पटोले म्हणाले, ‘‘काँग्रेस हा कायम शेतकरी हिताचा निर्णय घेणारा पक्ष आहे. राज्य अथवा देशपातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत. आंदोलकांनी मांडलेले प्रश्न सुटावेत, या साठी काँग्रेसचा प्रयत्न असेल.’’

‘आता पळापळ सुरू होईल’

मंत्री थोरात यांनी, ‘‘आम्ही पुणतांबा येथील आंदोलनाला भेट दिल्याचे कळताच इतर पुढाऱ्यांची पळापळ सुरू होईल,’’ असा टोमणा विरोधकांना मारला. ‘‘भाषणे ठोकली जातील. तुम्ही सुरु केलेले आंदोलन पाच तारखेपर्यंत सुरू राहू द्या. मागण्यांवर तोडगा निघेलच,’’ असा आशावाद देखील थोरात यांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com