Desi Mango : गावरान आंब्याची चव चाखण्याची आशा धूसर

गावरान आंब्याची चव चाखण्यासाठी दरवर्षी प्रतीक्षा करणाऱ्या खवय्यांना यंदा हा आंबा मिळण्याची शाश्‍वती फारच कमी आहे.
Mango
MangoAgrowon

Mango Season गावरान आंब्याची चव (Mango Taste) चाखण्यासाठी दरवर्षी प्रतीक्षा करणाऱ्या खवय्यांना यंदा हा आंबा मिळण्याची शाश्‍वती फारच कमी आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांतील वातावरणाचा मोठा फटका शेतीपिकांप्रमाणेच आंबा उत्पादनाला (Mango Production) बसला आहे.

सध्या बाजारात आंब्याची मागणी असली तरी गावरान आंबा गायब आहे. कर्नाटक, आंध्र, तसेच गुजरातमधून आलेल्या आंब्यावरच यंदाच्या हंगामाची भिस्त आहे.

एप्रिलच्या शेवटी आंब्याची बाजारात आवक सुरू होते. गावरान जातीच्या आंब्याची विशिष्ट, वेगवेगळ्या चवी, आंबटगोडवा हा आजही ग्राहकांना आकर्षित करतो. विविध जातींच्या आंब्यांची या भागात शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

यंदा सुरुवातीच्या टप्प्यात आंब्यांच्‍या झाडांवर मोठ्या प्रमाणात फुलोरा होता. त्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम चांगला राहील, अशी अपेक्षा होती. मात्र जसजसे दिवस पुढे लोटले तसे आंब्याचे नुकसान समोर येऊ लागले.

Mango
Desi Mango : गावरान आंबा होतोय दुर्मिळ

उरलीसुरली फळेही गळू लागली

मार्च महिन्यात दोन ते तीन वेळा धुके पडल्याने फुलोरा जळाला. यातून वाचलेल्या झाडांवर फळे लागली. नंतर मार्च व एप्रिलमध्ये तीन ते चार वेळा गारपिटीचे तडाखे बसले. यातून शिल्लक राहिलेली फळे आता वादळी पावसात जमिनीवर आली. सध्या झाडांवर पाच ते १० टक्केच बहर शिल्लक आहे. त्यातीलही फळे आपोआप गळत आहेत.

Mango
Mango Verity : आंब्याच्या जातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचं नाव

परराज्यांतील आंब्यांचीच गर्दी

नैसर्गिक संकटांमुळे आंब्याचे झालेले नुकसान पाहता यंदा ग्राहकांना बाहेरील आंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे. स्थानिक आंब्यांची चवच बाजारातून गायब झालेली आहे. त्यातही गावरान आंबे नसल्यासारखेच आहेत.

सध्या बाजारात बाहेरील राज्यातून आलेल्या आंब्यांचीच गर्दी झालेली आहे. त्यात बदाम, दशहरी, केसर, लालबाग, कर्नाटकचा हापूस अशा आंब्यांची विक्री होत आहे.

माझ्याकडे आंब्याची सुमारे १०० जुनी झाडे आहेत. यातील ३० ते ४० टक्के झाडांवर बहर आला आला होता. यापैकी काही आंब्यांवरील बहर धुक्यात जळाला. त्यानंतर गारपीट व वादळामुळे आंबे मोठ्या प्रमाणात गळाले. आता झाडांवर अवघी पाच टक्केही फळे शिल्लक राहिलेली नाहीत.
- अशोक चौधरी, आंबा उत्पादक, सावरगाव, जि. अकोलाw

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com