Weather Update : हवामान अंदाजाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी

Indian Meteorological Department : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
Weather Update
Weather UpdateAgrowon

Pune Weather Update : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक (Weather Update) सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. हवामानशास्त्र विभागाकडील माहितीचा आरोग्य विभागाला चांगला उपयोग करून घेता येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणेचे प्रमुख के. एस. होसळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी, डॉ. राजीव चटोपाध्याय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Weather Update
Weather News : मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘उन्हाळ्यात होत असलेल्या हवामानबदल पाहता हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज, इशारे याकडे सर्वांचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे. सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेची लाट, पावसाचे अंदाज, वादळवारा आदींबाबतच्या अंदाजांची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत.

शेतकरी तसेच सर्वसामान्य व्यक्तींसाठी ही माहिती उपयुक्त असल्याने प्रत्येक गाव, ग्रामपंचायत तसेच गावातील व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत.’’

श्री. होसळीकर म्हणाले, ‘‘हवामानशास्त्र विभागाकडून विविध अत्याधुनिक प्रारूपांचा उपयोग हवामान तसेच पावसाचा अंदाजासाठी केला जातो.

आगामी नैऋत्य मोसमी पावसाचा पहिल्या टप्प्यातील अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला असून, त्यानुसार सरासरीच्या ९६ टक्के म्हणजेच सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसावर प्रभाव टाकणाऱ्या अल निनो प्रवाहाची स्थिती या वर्षी पावसाळ्यात विकसित होण्याची शक्यता असली, तरी सध्यातरी त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com