Weather Update : पहाटे गारठा, दुपारी चटका

राज्यात तापमानात १० ते २० अंशांची तफावत
Weather Update
Weather Update Agrowon


पुणे : राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. तर किमान तापमानात घट झाल्याने गारठाही वाढला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा, तर दुपारी चटका, अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. आज (ता. २२) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

Weather Update
Weather Update : पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा चटका

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने बुधवारी (ता. २१) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १० अंश, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १०.१ अंश, औरंगाबाद येथे १०.२ अंश, निफाड येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान होता. तर रत्नागिरीत राज्यातील उच्चांकी ३४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानातही ११ ते अंशांपर्यंतची तफावत दिसून येत आहे.

राजस्थानातील चुरू येथे बुधवारी (ता. २१) देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील पंजाब, हरियाना, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा आहे. तर हरियाना, चंडीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

Weather Update
Hawaman Update : काही भागात पहाटे गारठा कायम | ॲग्रोवन

.............
--चौकट--
कमी दाबाचे क्षेत्राची वाढतेय तीव्रता
दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ असलेले कमी दाब क्षेत्र बुधवारी (ता. २१) ठळक झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येताना तीव्र कमी दाब क्षेत्रात (डिप्रेशन) रूपांतर होणार आहे. त्यानंतर हे कमी दाब क्षेत्र भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कोमोरिन भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.
.............

--चौकट--
बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३१.३ (११.५), जळगाव ३०.६ (१३.५), धुळे ३०.५ (१०), कोल्हापूर ३१.१ (१७), महाबळेश्‍वर २८.५ (१५.६), नाशिक ३१ (१३), निफाड ३०.८ (१०.४), सांगली ३२.६ (१५.३), सातारा ३२.३ (१४.२), सोलापूर ३३.४ (१७.१), सांताक्रूझ ३३.७(१६.६), डहाणू ३०.६ (१९.४), रत्नागिरी ३४.९ (१८.५), औरंगाबाद ३०.६ (१०.२), नांदेड - (१४), परभणी ३०.८ (१३.१), अकोला ३२.६ (१४.६), अमरावती ३२.६ (१४.४), बुलडाणा ३१ (१४.०), ब्रह्मपुरी ३२.६ (१४.४), चंद्रपूर २९.२ (१३.८), गडचिरोली २९.६ (१३.४), गोंदिया २९.८ (११.८), नागपूर ३१ (१२.९), वर्धा ३१ (१४.४), यवतमाळ ३०.५ (११.५).
---
पुणे ः शुक्रवारी (ता. २३) पहाटे साडेपाच वाजेपर्यंतच्या २४ तासांतील किमान तापमानाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com