Weather Update : परतीच्या काळात पावसाचे धुमशान

ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ७९ टक्के अधिक पाऊस
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा (Monsoon) प्रवास सुरू केल्यानंतर राज्यात पावसाने (Heavy Rainfall) अक्षरशः धुमशान घातले. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १३२.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा तब्बल ७९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. या काळात राज्याच्या सर्वच विभागात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह दमदार पाऊस कोसळला.

Weather Update
Cotton Production: देशातील कापूस उत्पादकता कमी का ? | ॲग्रोवन

यंदा मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) या कालावधीत महाराष्ट्रात १२१९.७ मिलिमीटर म्हणजेच २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात पावसाचा दणका सुरूच होता. ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ७४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तब्बल १३२.३ मिलिमीटर (७९ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. विभागनिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त होते. तेथे सरासरीपेक्षा तब्बल १०४ टक्के अधिक पाऊस कोसळला. तर कोकणात ४५ टक्के अधिक, मराठवाड्यात ७९ टक्के अधिक, तर विदर्भात ५१ टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

Weather Update
Indian : स्वतः भारतीय म्हणून शाबूत राहू !

ऑक्टोबर अखेरपर्यंत विभागनिहाय पडलेला पाऊस

विभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारी

कोकण---११६.४---१६८.५---+४५

मध्य महाराष्ट्र---७७.९---१५९.१---+१०४

मराठवाडा---७४.०---१३२.१---+७९

विदर्भ---५७.८---८७.३---+५१

मुंबई उपनगरात सर्वाधिक, चंद्रपूरमध्ये सर्वांत कमी

ऑक्टोबर महिन्यात राज्यातील जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची टक्केवारी विचारात घेता मुंबई उपनगरात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक १७९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांत कमी सरासरीच्या तुलनेत ३४ टक्के कमी पाऊस झाला आहे. गडचिरोलीत उणे ५ टक्के पावसाची नोंद होत पावसाने सरासरी गाठली. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात दमदार पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :

सरासरीपेक्षा खूप अधिक (५९ टक्क्यांपेक्षा अधिक) : पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया.

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :

मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, नांदेड, वर्धा

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) : गडचिरोली.

सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) : चंद्रपूर.

पोषक प्रणालीमुळे पावसाचा जोर

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) २० सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर २३ ऑक्टोबर मॉन्सून संपूर्ण देशातून परतला. यंदा मॉन्सूनच्या माघारीस आठवडाभराचा उशीर झाला. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले. परतीच्या काळात ऑक्टोबर महिन्यात २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान एक कमी दाबाचे क्षेत्र तर २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ‘सीतरंग’ चक्रीवादळ या दोन प्रमुख प्रणाली तयार झाल्या. तसेच दोन्ही समुद्रांतील चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीमुळे बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला. सीतरंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस झाला नसला, तरी मॉन्सून राज्यातून वेगाने परतण्यास पोषक स्थिती निर्माण झाली.

ऑक्टोबर महिन्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती, सरासरीच्या तुलनेत तफावत :

जिल्हा---सरासरी पाऊस---पडलेला पाऊस---तफावत टक्क्यांमध्ये

मुंबई शहर---७३.३---९७.३---+२७

पालघर---६१.३---९८.०---+६०

रायगड---११४.८---२०२.८---+७७

रत्नागिरी---१३३.६---१७०.३---+२७

सिंधुदुर्ग---१५२.७---२१२.७---+३९

मुंबई उपनगर---८१.२---२२६.३---+१७९

ठाणे---७३.४---१८५.६---+१५३

नगर---७५.३---१९४.६---+१५८

धुळे---३७.०---७८.४---+११२

जळगाव---४२.५---८९.१---११०

कोल्हापूर---११९.८---२७२.५---+१२७

नंदूरबार---३४.३---६९.३---+१०२

नाशिक---६३.८---११८.८---+८६

पुणे---८६.४---१७१.५---+९८

सांगली---१०६.२---१७३.४---+६३

सातारा---२११.१---९५.६---+१२१

सोलापूर---१०१.३---१७४.६---+७२

औरंगाबाद---५९.५---१३५.४---+१२८

बीड---७६.२---१६७.१---+११९

हिंगोली---६८.१---९६.४---+४२

जालना---६३.९---८६.०---+३५

लातूर---८६.३---१४६.३---+७०

नांदेड---७८.०---९५.३---+२२

उस्मानाबाद---८५.५---१९२.५---+१२५

परभणी---७५.५--१२३.८---+६४

अकोला---५४.१---९५.०---+७६

अमरावती---५०.४---८८.३---+७५

भंडारा---५२.४---१०६.५---+१०३

बुलडाणा---५५.८---१०४.४---+८२

चंद्रपूर---६५.२---४३.३---उणे ३४

गडचिरोली---६६.७---६३.५---उणे ५

गोंदिया---४७.४---८६.९---+८३

नागपूर---५१.७---१०१.४---+९६

वर्धा---५४.७---७५.४---+३८

वाशीम---६१.५---१३०.८---+११३

यवतमाळ---६१.६---१०८.१---+७५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com