Weather Update
Weather Update Agrowon

Weather Update : तापमानात चढ-उतार

राज्यात आज कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारठा वाढला असला, तरी राज्याच्या कमाल आणि किमान (Maximum And Minimum Temprature) तापमानात चढ-उतार होत आहेत. शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालय व निफाड (Niphad) येथील गहू संशोधन केंद्र (Wheat Research Station) येथे ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) राज्यात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.


 Weather Update
Weather Update : उत्तरेकडील वाऱ्यांमुळे थंडी वाढली | Agrowon | ॲग्रोवन

केरळ किनारपट्टी आणि लगतच्या अरबी समुद्रात सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कोमोरिन भागापासून दक्षिण अंदमान समुद्रापर्यंत हवेचा पूर्व-पश्‍चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच दक्षिण अंदमान समुद्रालगतच्या उपसागरात ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

राज्यात थंडीची चाहूल लागली असून, पहाटे गारठ्यासह, धुके आणि दव पडत आहे. कोकणासह दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांत कमाल तापमान २० अंशांच्या वर, तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी १८ अंशांच्या खाली आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या जवळपास पोचल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यातही कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 Weather Update
Weather Update : तापमानात चढ-उतार सुरूच


शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.१ (१३), जळगाव ३४.७ (१४.५), धुळे ३३.५ (११.७), कोल्हापूर ३१.३ (२०.१), महाबळेश्‍वर २६.७ (१४.९), नाशिक ३०.६ (१३.२), निफाड ३२ (११.७), सांगली ३२ (२०.१), सातारा ३०.७ (१६.३), सोलापूर ३४.२ (१९.२), सांताक्रूझ ३५.८(२०.२), डहाणू ३५.९ (१९.६), रत्नागिरी ३५.४ (२३), औरंगाबाद ३१.६ (१३.३), नांदेड ३१.८ (१६), उस्मानाबाद - (१४), परभणी ३२.४ (१५.५), अकोला ३४.३ (१८.२), अमरावती ३४.२ (१६), बुलडाणा ३१.४ (१७.५), ब्रह्मपुरी ३४ (१८), चंद्रपूर ३१.४ (१७.६), गडचिरोली ३२.४ (१६.८), गोंदिया ३२.६ (१६.५), नागपूर ३३.१ (१७.२), वर्धा ३३ (१७.५), वाशीम ३३.८ (१६.२), यवतमाळ ३२.५ (१६).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com