Weed Control
Weed ControlAgrowon

आंतरमशागत न झाल्याने तणाने पीक घेरले

गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने शेतीतील कामांनी पुन्हा वेग घेतला आहे. सततच्या पावसामुळे आंतरमशागत न झाल्याने पिकांमध्ये गवताचे प्रमाण वाढले असून, मजुरांची मागणी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अकोला ः गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा कमी झाल्याने शेतीतील कामांनी (Agriculture Work) पुन्हा वेग घेतला आहे. सततच्या पावसामुळे आंतरमशागत (Inter Culture Operation) न झाल्याने पिकांमध्ये गवताचे (Grass) प्रमाण वाढले असून, मजुरांची मागणी (Labour Demand) ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चार तासांच्या कामासाठी २०० ते २५० रुपये मजुरी चुकवावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे.

Weed Control
Crop Protection : भात पिकाचे प्रभावी संरक्षण

यंदा जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेला पाऊस १५ ऑगस्टपर्यंत सुरू होता. मध्यंतरी दोन-तीन दिवसांचा खंड पडला तरी पाण्यामुळे वाफसा होऊ शकला नाही. यामुळे प्रत्येक पिकात तण वाढले. अनेकांनी तणनाशकाचा वापर केल्याने काही प्रमाणात नियंत्रण मिळाले. मात्र कपाशीसारख्या पिकात तण वाढलेले आहे. प्रामुख्याने कपाशीच्या तासातील तणाने झाडे झाकोळली. हे तण निंदण्यासाठी मजुरांचीच गरज आहे. सध्या काही भागात पाऊस बंद असल्याने शेतीच्या मशागतीची कामे अधिक वेगाने केली जात आहेत.

मजुरांना मागणी, दरांत वाढ

एकाचवेळी सर्वत्र मजुरांची मागणी वाढल्याने अनेक भागांत मजुरीच्या दरांत वाढ झाली आहे. चार तासांच्या कामासाठी १५० रुपयांपर्यंत पूर्वी मजुरी चुकवावी लागत होती. आता हाच दर २०० ते २५० रुपयांदरम्यान पोहोचला आहे. शिवाय मजूर पुरवणाऱ्यांना प्रतिमजूर वेगळे पैसेही शेतकऱ्याला द्यावे लागत आहेत. महिला मजुरांनाही पुरुषांपेक्षा थोडी कमी मजुरी द्यावी लागत आहे. शेतात कामे मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक मजूर चार-चार तासांच्या दोन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com