Milk Collection : दूध केंद्रांवर १० ग्रॅम अचूकतेची तोलन उपकरणे बंधनकारक ः पवार

नियंत्रक वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सर्व दूध संकलन केंद्रांवर १० ग्रॅम अचूकता असलेली तोलन उपकरणे वापरणे बंधनकारक आहे.
milk collection
milk collection Agrowon

सांगली : नियंत्रक वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सर्व दूध संकलन (Milk Collection) केंद्रांवर १० ग्रॅम अचूकता असलेली तोलन उपकरणे (Weighing Equipment) वापरणे बंधनकारक आहे. ज्या केंद्रांवर अशा अचूकतेची इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे वापरणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वैधमापन शास्त्र कार्यालयाचे उपनियंत्रक द. प्र. पवार यांनी दिला.

milk collection
Milk Adulteration : कशी ओळखली जाते दुधातील भेसळ ?

जिल्ह्यातील अनेक दूध संकलन केंद्रांवर दूध खरेदी-विक्री करताना सुलभता यावी याकरिता इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर करण्यात येतो. सद्यःस्थितीत बऱ्याच केंद्रांवर १०० ग्रॅम अचूकता असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरात आहेत.

milk collection
Milk Collection : दूध संकलन ते पावडर निर्मितीत अग्रणी फुड्सची भरारी

दूध मापनामध्ये अधिक अचूकता यावी याकरिता नियंत्रक वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सर्व केंद्रांवर १० ग्रॅम अचूकतेची तोलन उपकरणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. १ जानेवारी २०२३ पासून सुधारित आदेशाची अंमलबजावणी सर्व केंद्रांद्वारे करण्यात यावी, असे नमूद आहे.

मात्र, काही केंद्रांवर अचूकतेचे वजन काटे वापरण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जी केंद्रे दूध मापनासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचा वापर करतात त्यांनी यापुढे १० ग्रॅम अचूकता असलेल्या वजन काट्यांचाच वापर करावा.

जी केंद्रे १० ग्रॅम अचूकतेची इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे वापरणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यास उपनियंत्रक वैधमापन शास्त्र सांगली, कार्यालयाकडे लेखी किंवा aclmsangli@yahoo.in या ई-मेलवर तक्रा दाखल करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com