
Palghar News : राज्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. तशी पाणीपातळी (water level) घटू लागली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण (Pedestal for water) करावी लागत आहे. त्यात सर्वात जास्त पायपीठ महिलांची होती.
पालघर जिल्ह्यामधील केळवे धावंगेपाड्यातील चिमुरड्याने आपल्या आईचे पाण्यासाठी होणार हाल थांवावे यासाठी चक्क घरासमोरच विहीर खोदली (A well dug) आहे.
पालघर जिल्ह्याच्या केळवेमधील धावांगेपाड्यामध्ये आदिवासी समाजातील लोक राहतात. या आदिवासी पाड्यामध्य लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यांना पाण्याच्या पाण्यासाठी अर्धा किलोमीटरवर असलेल्या विहिरीवर जावे लागते.
या पाड्यामध्ये राहणाऱ्या सालकर कुटुंबियांना याच विहिरीवरून पाणी आणावे लागते. रमेश आणि दर्शना सालकर हे दाम्पत्य बागायतदार वाडीत मजुरीचे काम करतात. दररोज सायंकाळी मोलमजुरी करून संध्याकाळी घरी परतल्यावर दर्शना सालकर यांना आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते.
आईची ही पाण्यासाठी होणारी रोजची दमछाक त्यांचा आठवीत शिकणारा मुलगा प्रणयला बघवली नव्हती. म्हणून त्याने विहीर खोदायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा वापर केला.
१४ वर्षांच्या या चिमुरड्याने सलग चार दिवस खड्डा खोदला. अखेर 18 फूटानंतर प्रणयच्या भगिरथी प्रयत्नांना यश मिळाले. पिण्यायोग्य पाणी लागल्यानंतर त्याने खोदकाम थांबवले. आईची पाण्यासाठी होणारी पायपीट कमी झाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर प्रणयची आई दर्शना यांनी देखील समाधान व्यक्त केल आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.