प्रकल्पग्रस्त न्याय हक्कासाठी लढणार

रोजगार न दिल्याने चेहेर, मिठेखार येथील शेतकरी आक्रमक
Project
ProjectAgrowon

अलिबाग : मुरूड तालुक्यातील साळाव या ठिकाणी वेलस्पन मॅक्सटील प्रा. लि. ( Welspun Maxtil Pvt. Ltd. project ) हा प्रकल्प उभारणीसाठी चेहेर व मिठेखार येथील शेतकऱ्यांच्या सुमारे ७५० एकर जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या; मात्र आजही येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी रोजगारासाठी वणवण करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी आता आक्रमक भूमिका घेत आपल्या मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबत पावले उचलली जातील, असा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने अजय चवरकर यांनी दिला.

Project
Women Empowerment : महिला हक्कासाठी लढणाऱ्या : चंद्रप्रभा

अलिबाग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बुधवारी (ता. २८) बोलत होते. मुरूड तालुक्यातील चेहेर व मिठेखार येथील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी २००९ मध्ये प्रकल्प निर्माण करण्यासाठी कमी किमतीमध्ये प्रशासनाने घेतल्या. फक्त २५० ते ३०० एकर जमिनीचा प्रकल्पासाठी वापर करण्यात आला. अन्य जमीन आजही पडून आहे. आजतागायत १२ वर्ष होऊनही संपादित जमीन वापरात नाही. त्या जमिनीच्या बदल्यात बाधित शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी नोकरीची लेखी हमी दिली होती. तसेच मानधन व वाढीव रक्कम देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची कोणतीही पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेउन मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्णय
स्पष्ट केला.

Project
Tribal Rights : आदिवासी कुटुंबांच्या न्याय हक्कासाठी सतत संघर्ष ः वळसे

अशा आहेत मागण्या
सामंजस्य कराराप्रमाणे बाजारभावाप्रमाणे पूर्ण मानधन देण्यात यावे. सुरुवातीला झालेला शेतकऱ्यांचा व्यवहार आणि आता होणारा व्यवहार यातील रकमेची तफावत वाढीव रकमेच्या स्वरूपात मिळावी. १९८९ मध्ये सिकॉम कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या होत्या; परंतु प्रत्यक्ष नोकर भरतीत सामावून न घेतलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चालू बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला द्यावा. नोकरी मागण्यास गेलेल्या स्थानिक शेतकऱ्यांवर पोलिस ठाण्यात कंपनी प्रशासनाकडून खोटे गुन्हे नोंदवून गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कंपनी प्रशासनाने थांबवावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com