Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी किसान सभेचा ऑनलाईन ट्रेंड

ओला दुष्काळ प्रश्नी पक्ष, पार्ट्या, झेंडे यांच्या पलीकडे जात राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांनी पुकारलेला ऑनलाईन ट्रेंड आज मोठ्या प्रमाणात यशस्वी होतोय.
Ajit Nawale
Ajit NawaleAgrowon

ओला दुष्काळ प्रश्नी पक्ष, पार्ट्या, झेंडे यांच्या पलीकडे जात राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांनी पुकारलेला ऑनलाईन ट्रेंड आज मोठ्या प्रमाणात यशस्वी होतोय.

Ajit Nawale
Agriculture : शेती शोषणमुक्त कधी होणार ?

पत्रकार, बुद्धिजीवी, विचारवंत, मध्यमवर्गीयांचा मोठा प्रतिसाद ऑनलाईन ट्रेंडला मिळतो आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने ऑनलाईन ट्रेंडमध्ये व्यक्त होणाऱ्या या उद्रेकाची योग्य दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास रस्त्यावर उतरून आरपरचा संघर्ष करावा लागेल.

किसान सभेचे राज्याचे अधिवेशन दि. 31 ऑक्टोबर व 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात होत आहे.

केंद्र तसेच राज्याचे नेतृत्व व राज्यभरातील निवडलेले 300 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी 3 दिवस एकत्र असणार आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पोरांनी आज सुरू केलेल्या ऑनलाईन ट्रेंडची योग्य दखल घेतली नाही तर या अधिवेशनात विचार विनिमय करून राज्यात भव्य आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com