Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करावा ः खासदार सुळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोठे आणि कसे चालले आहे हे कळेनासे झाले आहे. अतिवृष्टी झाली आहे, मात्र कोणालाच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आलेलं नाही.
Supriya Sule
Supriya Sule Agrowon

वाल्हे, जि. पुणे ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोठे आणि कसे चालले आहे हे कळेनासे झाले आहे. अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे, मात्र कोणालाच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आलेलं नाही. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेऊन सरसकट ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले

Supriya Sule
Wet Drought : सर्वत्र ओल्या दुष्काळाची भयाण स्थिती

मांडकी (ता. पुरंदर) येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २ कोटी २६ लाख ७८ हजार ३२२ निधीच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, विराज काकडे, सोमेश्‍वरचे संचालक अनंता तांबे, पुष्कराज जाधव, सुदाम इंगळे, प्रदीप पोमण, उत्तम धुमाळ, हेमंतकुमार माहुरकर, अजिंक्य टेकवडे, गणेश जगताप आदि उपस्थित होते.

Supriya Sule
Kharif Crop Damage : खरिपाचे नुकसान; रब्बी हंगामही अडचणीत

खासदार सुळे म्हणाल्या, की अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, ऐन दिवाळीत सध्या बळीराजा मोठ्या अडचणीत आला आहे. मात्र तरीसुद्धा शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळत नाही. शेतकरी जगवायचा असेल तर तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबरोबर सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह शिवसेनेच्या माजी मंत्र्यांनी मुख्यमंत्री तसेच सरकारला निवेदन दिले आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलता दाखवून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचप्रमाणे अतिवृष्टीमधील सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. दरम्यान यावेळी आमदार संजय जगताप, संजीवन जगताप, मोहन जगताप, अभिजित जगताप आदींची भाषणे झाली. सरपंच प्रियंका शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मानसिंग साळुंके यांनी तर मोहन जगताप व विश्‍वास जगताप यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com