Rain Prediction : राज्यात पावसाची स्थिती काय ?

राज्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. तर ईशान्येतीला काही राज्यांमध्ये सितरंग वादळामुळे पाऊस पडतोय.
Rain Prediction
Rain PredictionAgrowon

पुणेः राज्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची (Heavy Rainfall) उघडीप कायम आहे. तर ईशान्येतीला काही राज्यांमध्ये सितरंग वादळामुळे (Sitrang Storm) पाऊस पडतोय. मात्र देशातील इतर भागांमध्ये पावसाची उघडीप होती. तर राज्यात पुढील पाच दिवस पाऊस नसेल, असा अंदाज हवामान विभागानं जाहीर केलाय.

Rain Prediction
Crop Harvesting : सुगीच्या कामामुळे दिवाळीतही शेतकऱ्यांना नाही उसंत

बंगालचा उपसागरात रविवारी सायंकाळी निर्माण झालेल्या ‘सितरंग’ चक्रीवादळामुळं ईशान्य भारतातील काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अरुणाचल प्रदेश, आसामच्या काही भागांत अतिजोरदार पाऊस पडत आहे. तर मेघालय आणि नागालॅंडमध्ये जोरदार पाऊस होत आहे. तर आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यात जोराचा वारा वाहत आहे.

देशातून माॅन्सून गेल्यानंतर पावसाची उघडीप कायम आहे. राज्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्याची नोंद आहे. मात्र जोरदार पाऊस नव्हता. मध्य महाराष्ट्रात काही भागांत काही काळ ढगाळ हवामान होतं. मात्र पावसाची नोंद नाही. मराठवाडा आणि विदर्भात ऊन पडलं होतं. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र नोंद घेण्याजोगा पाऊस पडला नाही.

राज्यात पावसानं उघाडीप दिल्यानं शेतकरी पीक काढणीच्या कामात मग्न आहेत. दिवाळी सणाच्या काळातही शेतकऱ्यांनी कापूस वेचणी आणि सोयाबीन मळणीच्या कामाला प्राधान्य दिल्याचं दिसतं. हवामान विभागानं पुढील पाच दिवस राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com