Chandrashekhar Bavankule : उद्योजक-राजकारणी यांच्या संबंधात गैर काय?

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसतानाही ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleAgrowon

Nagpur Politics News :‘‘महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात आंदोलन केल्यावर हजारो केसेस आमच्या कार्यकर्त्यांवर लावल्या गेल्या होत्या,’’ याची आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून देत ते म्हणाले, ‘‘आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मागणीसाठी आंदोलन जरूर करावे. पण कुणाच्याही घरावर जाणे योग्य नाही.’’

गुरुवारी (ता. २०) नागपुरात विचार परिवार व भाजप संघटनेची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, ‘‘कोणत्याही आंदोलनाचा शेवट पोलिसांकडून अटक करून अथवा आंदोलकांना ताब्यात घेऊन होतो. आंदोलकांची मागणी सरकारने तपासली पाहिजे, ते काम सरकार करेल. परंतु कुणाच्या घरावर जाणे हे पोलिस कसे सहन करतील,’’ असा प्रश्‍न त्यांनी केला.

Chandrashekhar Bavankule
Sharad Pawar : सर्वोच्च न्यायालयाची समितीच ‘जेपीसी’पेक्षा पारदर्शी

खारघर प्रकरणात बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसतानाही ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जे नुकसान झाले ते भरून निघू शकणार नाही. कुटुंबाच्या मागे सरकारने व समाजाने उभे राहायला हवे, ते आम्ही करीत आहोत, असे सांगून त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योजक अदानी यांची गुरुवारी (ता. २०) पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट झाली. याबाबत विचारले असता, माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार आणि गौतम अदानी यांचे कौटुंबिक संबंध आहेत. ते चांगले मित्र आहेत. राजकारणात व्यावसायिक मित्र असणे चुकीचे नाही.

Chandrashekhar Bavankule
Sharad Pawar On Ajit Pawar : 'मी काय सांगतो ते महत्त्वाचं' ; अजित पवारांविषयीच्या चर्चांना शरद पवारांचा पूर्णविराम?

यात राजकारण होऊ नये. याबाबत शरद पवार यांनी विस्ताराने सांगितले असून, शरद पवारांनी जेपीसी समितीवर आपले मत व्यक्त केले आहे,’’ असेही बावनकुळे म्हणाले. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर बैठकीत अजित पवारांचे नाव नसल्याविषयी विचारल्यावर, बावनकुळे म्हणाले, ‘‘हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे.’’

विचार परिवार व भाजपच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आदिवासी आणि वनवासी भागात केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. सर्वांकडून माहिती घेणे व ती सरकारपर्यंत पोहोचविणे हे आमचे काम आहे, असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com