
औरंगाबाद : तुमच्या देशात शेती करतात नेमकी कशी, कोणती पिके तुम्ही घेता, प्रमुख पीक नेमके कोणते, अनेक देश शेती विषयात आपलं नावलौकिक मिळवत असताना शेती अभ्यासासाठी (Agriculture Study) आमच्याच देशाची आणि महाराष्ट्राची निवड तुम्ही का केली...असे एक ना अनेक प्रश्न भराडीच्या ज्ञानविकास विद्यालयाच्या (Dyan Vikas School) विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. ६) केनियाच्या ल्युकेनिया विद्यापीठाच्या (Lukenya University) शिष्टमंडळाला विचारले.
ल्युकेनिया विद्यापीठाचे कौन्सिल मेंबर सचिन शहा, कसंगा डेव्हिड दंबुकी, मुवेला सामी मुटावि,अशोक लडकत आदींचा समावेश आहे. ता. ५ डिसेंबरला औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील रेशीम उद्योगाशी (Silk Industry) संबंधित विषयाची पाहणी करत माहिती जाणून घेतली.
जालना जिल्ह्यातील उजवणे यांच्या शेती व पर्यटन केंद्राची पाहणी केल्यानंतर देळेगव्हाण येथील गटशेती सदस्यांशी शिष्टमंडळाने संवाद केला. ६ डिसेंबरला पैठण तालुक्यातील नाथ सीड्सच्या आंबाबागेची पाहणी केल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील भराडी माधव इरिगेशनच्या प्रकल्पाला भेट देऊन इष्टमंडळाने ठिबक निर्मिती व स्प्रिंकलर उत्पादनाविषयी तांत्रिक माहिती जाणून घेतली. यावेळी ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे शिष्टमंडळाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रश्नांना डॉ. सचिन शहा, कसंगा डेव्हिड दंबूकी, मुवेला सामी मुटावि यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
‘‘भारताची शेती संस्कृती आणि केनियन शेती संस्कृती बरीचशी मिळते जुळती आहे. भारतीय आपल्याकडील ज्ञान देण्याच्या मानसिकतेत असतात. त्यामुळे भारताची त्यात महाराष्ट्राची आणि त्यातही आमच्या शेतीशी मिळते जुळते स्ट्रक्चर असलेल्या मराठवाड्यातील शेतीची, पीक पद्धतीची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही निवड केली. शेती विषयाचे ज्ञान केनियाच्या तुलनेत भारताकडे अति प्रगत असे आहे.
या भागातून परत जाताना आमच्या गाठीशी शेती विषयक ज्ञानआमच्या सोबत असणार आहे,’’ असे मत, दंबुकी, मुटावि यांनी व्यक्त केले. त्यानंतर शिष्टमंडळाने वडाळा येथील आकाश शेळके यांच्या मका, कापूस पिकाची, मुकपाठ येथील अशोक सूर्यवंशी यांच्या अतिघन आंबा बागेची माहिती जाणून घेतली. आडगाव भोंबे ता. भोकरदन येथील रोकडोबा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांशीही शिष्टमंडळाने संवाद साधला. यावेळी डॉ. भगवानराव कापसे, डॉ. माने, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. बैनाडे, विलास कापसे, विकास कापसे आदी शिष्टमंडळ सोबत होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.