Wheat Sowing : गव्हाचे क्षेत्र सरासरीच्या तुलनेत कमी

यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात शुक्रवार (ता. १६) पर्यंत परभणी-हिंगोली जिल्ह्यांत गव्हाची ८१ हजार ८१३ पैकी ५८ हजार २५९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Wheat
Wheat Agrowon

परभणी ः यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात (Rabi Season) शुक्रवार (ता. १६) पर्यंत परभणी-हिंगोली जिल्ह्यांत गव्हाची ८१ हजार ८१३ पैकी ५८ हजार २५९ हेक्टरवर पेरणी (Wheat Sowing) झाली आहे. त्यात परभणी जिल्ह्यात ३९ हजार ३०८ पैकी २८ हजार ४७८ हेक्टरवर (७२.४५ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात ४२ हजार ५०५ पैकी २९ हजार ७८१ हेक्टरवर (७०.०६ टक्के) गव्हाची पेरणी (Wheat Cultivation) झाली आहे. या दोन जिल्ह्यांत गव्हाच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पेरणी क्षेत्र अद्याप २३ हजार ५५४ हेक्टरने कमी आहे.

दरम्यान, शुक्रवार पर्यंत या दोन जिल्ह्यांत विविध रब्बी पिकांची मिळून एकूण ४ लाख १८ हजार ४४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी २ लाख ६६ हजार १३२ हेक्टरवर (९८.२६ टक्के) पेरणी झाली आहेत. त्यात ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी १ लाख ८ हजार ५९४ हेक्टरवर (७०.१२ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ७८ हजार ३२४ हेक्टर पेरणीचा समावेश आहे. कडधान्यांची १ लाख १२ हजार २७२ पैकी १ लाख ५६ हजार हेक्टर) पेरणी झाली आहे.

Wheat
Wheat Sowing : शेवगाव तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढणार

हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ५६ हजार २०३ हेक्टरवर (१३९.२५ टक्के) पेरणी झाली आहे. करडई, जवळ, तीळ, सूर्यफूल या गळीत धान्यांची ३ हजार ३४४ पैकी १ हजार २८४ हेक्टर (३५.२६ टक्के) पेरणी झाली. त्यात करडईची ३ हजार ३७५ पैकी १ हजार २२३ हेक्टर (३६.२७ टक्के), जवसाची ११९ पैकी ३६ हेक्टर (३०.५९ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी १२ हेक्टर (३५.६७ टक्के), सूर्यफुलाची २६.२ पैकी ९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Wheat
Wheat Sowing : उशिरा गहू पेरणीचे नियोजन

हिंगोली जिल्ह्यात तृणधान्यांची ५५ हजार ६७९ पैकी ३७ हजार २६३ हेक्टरवर (६६.९२ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीच्या ११ हजार ६९७ पैकी ६ हजार ८८२ हेक्टर (५८.८४ टक्के) पेरणीचा समावेश आहे. कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ पैकी १ लाख १४ हजार ९७१ हेक्टर (९५.५२ टक्के) पेरणी आहे. हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १ लाखं १४ हजार ८८२ हेक्टरवर (९५.६२ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्याची ८४२ पैकी ७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

तीन तालुक्यांत गव्हाचे पेऱ्यात वाढ

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, मानवत, हिंगोली जिल्ह्यांतील सेनगाव तालुक्यात गव्हाची सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली आहे. उर्वरित १२ तालुक्यांत गव्हाचा पेरा कमी आहे.

परभणी, हिंगोली जिल्हा गहू पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी १२००० ५९०७ ४९.२३

जिंतूर ४८२९ ५७०० .११८.०३

सेलू ४३४८ ४१५५ ९५.५६

मानवत २३४९ २७१५ ११५.५६

पाथरी २७२१ १६३० ५९.९०

सोनपेठ .१४१६ १०१७ ७१.८०

गंगाखेड २७८२ २७६१ ९९.२५

पालम २५६१ २४९० ९७.२३

पूर्णा ६३०० २१०३ ३३.३८

हिंगोली ६६८२ ५२०० ७७.८२

कळमनुरी १०२०३ ७८२४ ७६.६८

वसमत १५९६४ ७२६४ ४५.५

औंढा नागनाथ ६१९५ ५१०० ८२.३२

सेनगाव .३४६० ४३९३ १२६.९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com