Wheat Crop : खानदेशात गहू पीक जोमात

खानदेशात गव्हाची पेरणी स्थिर आहे. परंतु उशिरा गहू पेरणी वाढली. कारण कापूस पिकाबाबत समाधानकारक स्थिती नव्हती. त्यात गुलाबी बोंड अळी आणि कमी दर अशी समस्या होती. यंदा पाऊसमान चांगले आहे.
Wheat Crop
Wheat CropAgrowon

जळगाव ः खानदेशात गहू पीक (Wheat Crop) जोमात आहे. यंदा उशिरा म्हणजेच १५ ते २० डिसेंबरनंतरही पेरणी झाली आहे. पिकाची वाढ चांगली आहे. थंडीचे वातावरण (Cold Weather) पिकास अनुकूल ठरत आहे.

खानदेशात गव्हाची पेरणी स्थिर आहे. परंतु उशिरा गहू पेरणी वाढली. कारण कापूस पिकाबाबत समाधानकारक स्थिती नव्हती.

त्यात गुलाबी बोंड अळी आणि कमी दर अशी समस्या होती. यंदा पाऊसमान चांगले आहे. गव्हाचे दरही बाजारात टिकून आहेत.

यामुळे कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात गहू पेरणीला वेग आला. यामुळे नंतरही गव्हाखालील क्षेत्र वधारल्याची माहिती आहे. सध्या किमान २५०० व कमाल २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर लोकवन गव्हास आहे.

जळगावात गिरणा, वाघूर, हतनूर, मन्याड आदी प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. धुळ्यातही अनेर, पांझरा प्रकल्पाचे पाणी रब्बीसाठी मुबलक होते. यामुळे शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली. परिणामी क्षेत्रात किंचित वाढ दिसत आहे.

खानदेशात दरवर्षी २६ ते २७ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी केली जाते. परंतु यंदा क्षेत्र सुमारे २९ हजार हेक्टर आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात गव्हाची सुमारे १७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

या पाठोपाठ धुळ्यात सुमारे सात हजार हेक्टर आणि नंदुरबारात सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. उशिरा पेरणी झाल्याने क्षेत्र वाढले. कारण अनेकांनी उशिरा पेरणी करताना मका, ज्वारी ऐवजी गव्हास पसंती दिली.

Wheat Crop
Wheat Cultivation : जिद्दीच्या जोरावर ३५ गुंठ्यांत २० क्विंटल गव्हाचे उत्पादन

या आठवड्यात खानदेशात थंडी बऱ्यापैकी आहे. शुक्रवारी (ता. १३) काही भागात किमान तापमान ८ अंश सेल्सिअस होते. तर काही भागातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर होते. थंडी कायम राहिल्यास पिकाची चांगली वाढ होईल.

पिकांना ठिबकद्वारे सिंचन

जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात गहू पीक अधिक आहे.

उशिरा पेरणीचा गहूदेखील आठ ते १० दिवसांचा झाला आहे. त्यातही बीजांकुरण चांगले आहे. वेळेत पेरणी केलेल्या गहू पिकात तीन ते चार वेळेस सिंचन करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाच्या मदतीने सिंचन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com