Wheat Harvesting : खानदेशात गहू पीक मळणीवर

खानदेशात नोव्हेंबरच्या सुरुवातीला पेरणी केलेले गहू पीक मळणीवर आले आहे. या पिकास हलक्या व मध्यम जमिनीत मागील १०० दिवसांत आठ वेळेस पाण्याच्या पाळ्या शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.
Wheat Harvesting
Wheat HarvestingAgrowon

Wheat Harvesting जळगाव ः खानदेशात नोव्हेंबरच्या सुरुवातीला पेरणी (Wheat Sowing) केलेले गहू पीक मळणीवर (Wheat Threshing) आले आहे. या पिकास हलक्या व मध्यम जमिनीत मागील १०० दिवसांत आठ वेळेस पाण्याच्या पाळ्या शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.

गहू पिकाची पेरणी (Wheat Cultivation) खानदेशात रब्बीमध्ये चौथ्या क्रमांकावर केली जाते. मागील चार वर्षे पाऊसमान चांगले आहे. यामुळे पेरणी क्षेत्र स्थिर किंवा सर्वसाधारण क्षेत्राऐवढेच आहे. तसेच उत्पादकताही बरी आहे.

Wheat Harvesting
Wheat Harvesting : गव्हाचे पीक आले सोंगणीला

हलक्या व मध्यम जमिनीत मात्र उत्पादन कमी हाती येत असल्याची स्थिती आहे. कारण या क्षेत्रात पाणी अधिक लागते. पिकाची वाढ जोमात होत नाही. यंदा सुरुवातीला पेरणी कमी होती. कारण अनेक कृत्रीम जलसाठाधारक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक न काढता त्यातून चांगले फरदड किंवा खोडवा कापूस उत्पादन घेण्याचे नियोजन केले होते.

काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढल्यानंतर फवारणीदेखील घेतली.

परंतु याच काळात कापूस दर कमी झाले. दरात सुधारणा फारशी झाली नाही. रोगराई होती, शिवाय कापूस वेचणीचा खर्च प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांवर गेला. शिवाय पिकाचे सिंचनही करावे लागत होते.

पिकाची स्थिती रोगराईने खराब झाल्याने शेतकऱ्यांनी डिसेंबरच्या मध्यातच कापूस पीक काढण्यास सुरवात केली.

पीक काढून त्यात काहींनी मका लागवड केली. तसेच अनेकांनी वेलवर्गीय पिकांची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी मात्र गहू पेरणी केली. यामुळे डिसेंबरनंतरही गहू पेरणी झाली.

Wheat Harvesting
Tur, Wheat Rate : तूर, गहू आणि तांदूळ दर कमी करण्यासाठी सरकारची धडपड

परिणामी, खानदेशात गहू पेरणीचे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या पातळीपर्यंत पोहोचले. यात नोव्हेंबरच्या सुरवातीला पेरणी केलेल्या मध्यम, हलक्या क्षेत्रातील गहू पीक मळणीवर आले आहे.

यंदा थंडी कमी अधिक होती, यामुळे पीकही बरे आहे. येत्या १० दिवसानंतर पिकात मळणीदेखील अनेक शेतकरी सुरू करतील. अनेकांनी याच आठवड्यात पिकाला अखेरच्या वेळेस पाण्याची पाळी दिली आहे.

दाणे पक्व झाले आहेत. मळणीसाठी खानदेशात परराज्यातील हार्वेस्टरचालकही दाखल झाले आहेत. हार्वेस्टरचालक प्रतिएकर १२०० ते १४०० रुपये दर मळणीसाठी सांगत आहेत. इंधन महागल्याने मळणीसाठीदेखील खर्च अधिक येणार आहे.

खानदेशात गहू पेरणी स्थिती अशी...

जळगाव जिल्ह्यात सुमारे १७ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १० हजार हेक्टरवर गहू पीक होते.

गव्हाची पेरणीदेखील मक्यासारखी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात झाली आहे.

१५ डिसेंबरपर्यंत गहू पिकाची पेरणी करण्याचा संकेत आहे. किंवा १५ डिसेंबरपूर्वी गहू पेरणी केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसतो, असे शेतकरी मानतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com