Wheat Sowing : परभणी, हिंगोलीत गव्हाची ७३ हजार हेक्टरवर पेरणी

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामात शुक्रवार (ता. १३) पर्यंत एकूण ७३ हजार ३१४ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.
Wheat sowing
Wheat sowing Agrowon

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामात (Rabi Season) शुक्रवार (ता. १३) पर्यंत एकूण ७३ हजार ३१४ हेक्टरवर गव्हाची पेरणी (Wheat Sowing) झाली आहे. या जिल्ह्यांतील एकूण रब्बी पेरणी क्षेत्रात (RabiSowing Acreage) गव्हाचे क्षेत्र १४.७० टक्के आहे. परभणीतील जिंतूर, मानवत, पालम, तर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यात गव्हाची सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली आहे.

Wheat sowing
Wheat Market: सरकार खुल्या बाजारात गहू विकण्याची शक्यता

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९८ हेक्टर आहे. शुक्रवार (ता.१३) पर्यंत ३ लाख ४ हजार २३२ हेक्टरवर (११२.३५ टक्के) पेरणी झाली. एकूण तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ हेक्टर पैकी १ लाख २२ हजार ५२१ हेक्टरवर (७९.११ टक्के) पेरणी झाली.

त्यात गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी ३४ हजार ७१७ हेक्टरवर (८८.३२ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार २७२ असताना १ लाख ८० हजार २९३ हेक्टरवर (१६०.५९ टक्के), गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी १ हजार ४१७ हेक्टरवर (३८.८८ टक्के) पेरणी झाली आहे.

Wheat sowing
Wheat production: यंदा भारतात गव्हाचे बंपर उत्पादन होणार?

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर आहे. तर १ लाख ९४ हजार २२० हेक्टरवर (१०९.८० टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची ५५ हजार ६७९ हेक्टरपैकी ४९ हजार ९९५ हेक्टरवर (८९.७९ टक्के) पेरणी झाली.

त्यात गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ३८ हजार ५९७ हेक्टर (९०.८१ टक्के) पेरणी झाली. कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार ३६९ हेक्टर आहे. तर १ लाख ४३ हजार ८७३ हेक्टरवर (११९.५३ टक्के) पेरणी झाली.

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील गहू पेरणी (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी १२००० ६६३१ ५५.२६

जिंतूर ४८२९ ७३५० १५२.१९

सेलू ४३४८ ४३२५ ९९.४७

मानवत २३४९ २९६६ १२६.२४

पाथरी २७२१ २२७३ ८३.५३

सोनपेठ १४१६ १०९५ ७७.३१

गंगाखेड २७८२ २७६१ ९९.२५

पालम २५६१ ३१२० १२१.८३

पूर्णा ६३०० ४१९६ ६६.५९

हिंगोली ६६८२ ६६३२ ९९.२५

कळमनुरी १०२०३ ७८२६ ७६.७०

वसमत १५९६४ १३२०१ ८२.६९

औंढा नागनाथ ६१९५ ६४५० १०४.१२

सेनगाव ३४६० ४४८८ १२९.६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com