Crop Loan : खरीप हंगामासाठी पीककर्ज कधी मिळणार?

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीककर्जाचे उद्दिष्ट १९६८ कोटी आहे. निश्‍चित केलेल्या उद्दिष्टापैकी ५५ टक्के म्हणजे १०७७ कोटी रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) पीककर्जाचे उद्दिष्ट (Crop Loan Target) १९६८ कोटी आहे. निश्‍चित केलेल्या उद्दिष्टापैकी ५५ टक्के म्हणजे १०७७ कोटी रुपये कर्जपुरवठा (Loan supply) करण्यात आला आहे. तर अद्याप ४५ टक्के कर्जपुरवठ्याची शेतकऱ्यांना (Farmers Still Waiting For Crop Loan) प्रतीक्षा आहे. कर्ज कधी मिळणार, असा प्रश्‍न शेतकरी करीत आहेत.

Crop Loan
Crop Loan : पीक कर्जप्रश्‍नी कृषी समिती आक्रमक

जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी बॅंका तयारी करतात; मात्र जिल्हा बॅंक वगळता खासगी आणि राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी सातत्याने पाठीमागे राहत असल्याचे दिसते आहे. जिल्हा बॅंक आणि ग्रामीण बॅंकांकडून कर्जवाटपाचा आलेख वाढता असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी बॅंकांनी पुन्हा एकदा हात आखडता घेतल्याची स्थिती आहे.

प्रशासकीय पातळ्यांवरही कागदी घोडे नाचवले जातात, तरीही खरिपाचा हंगाम संपेपर्यंत कर्जपुरवठ्याचे काम सुरूच राहते. त्यामुळे वेळेत पीक कर्जपुरवठ्याचे आदेश सूचनांपुरतेच मर्यादित राहत आहेत.

Crop Loan
Crop Loan : ‘पीडीसीसी’कडून ९६ टक्के पीककर्ज वाटप

यंदाच्या खरीप हंगामासाठी सांगलीत जिल्हा बँकेने १०८८ कोटींचे उद्दिष्ट असताना ८०२ कोटी रुपये कर्जपुरवठा, म्हणजे ७४ टक्के केला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण बॅंकांनी २८८ कोटींचे उद्दिष्ट असताना ४६३ कोटी म्हणजे १६१ टक्के कर्जपुरवठा केला आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांना ५२६ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १९८ कोटी म्हणजे केवळ ३८ टक्के कर्जपुरवठा केला आहे. खासगी बॅंकांनी ३५० कोटी रुपये उद्दिष्टांपैकी केवळ ७२ कोटींचा म्हणजे २१ टक्के कर्जपुरवठा केला आहे.

बॅंकांचे कर्जवाटप

बँक रक्कम

(लाख रु.) टक्केवारी

जिल्हा बॅंक ८०२१७ ७४

राष्ट्रीयीकृत १९८०७ ३८

खासगी ७२९५ २१

ग्रामीण ४६३ १६१

जिल्ह्यात ज्या बँकांकडून पीककर्जासाठी टाळाटाळ किंवा किरकोळ कर्जपुरवठा केला जात आहे. त्या बँकांकडे विविध शासकीय खात्यांतील ठेवी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांची पगार खाती ठेवायची का, याचा विचार जिल्हास्तरीय प्रशासन विचार करीत आहे. भविष्यात सूचना देऊनही बँकांनी पीक कर्जपुरवठ्यांचे प्रमाण ठेवले नाही तर जिल्हा प्रशासन ठेवींबाबत विचार करेल.
महेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com