Paddy Bonus : धान उत्पादकांना बोनस कधी मिळणार?

हमीभाव केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादित प्रति हेक्‍टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ही घोषणा केली.
Paddy Bonus
Paddy BonusAgrowon

नागपूर ः हमीभाव केंद्रावर धान (Paddy) विकणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादित प्रति हेक्‍टरी १५ हजार रुपये बोनस (Paddy Bonus) देण्याची घोषणा करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ही घोषणा केली. अधिवेशनाला महिनाभराचा कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत या संदर्भाने आदेश काढण्यात आले नाही. त्यामुळे बोनस बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व्यक्‍त होत आहे.

Paddy Bonus
Paddy Rate : धानाला किमान चार हजार रुपये जाहीर करा

वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीत येत असलेल्या धान उत्पादकांना विचारात घेऊन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रोत्साहन राशी दिली जाते.

वर्ष २०१८-१९ मध्ये ५०० रुपये प्रति क्विंटल तर वर्ष १९२० -२१ मध्ये ७०० रुपये प्रोत्साहन राशी देण्याची मर्यादा प्रति शेतकरी क्विंटल मंजूर करण्यात आली होती.

Paddy Bonus
Paddy Rate : भात, नाचणी नोंदणीस मुदतवाढ

परंतु यंदा प्रतिहेक्‍टरी १५ हजार रुपये २ हेक्‍टरच्या मर्यादेत देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे.

प्रति हेक्‍टर धानाचे उत्पादन सरासरी ३८ क्विंटल पर्यंत असून, बोनसची रक्‍कम ३५ हजारांच्या घरात जायची. परंतु मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार दोन हेक्‍टरच्या मर्यादेत १५ हजार प्रमाणे ३० हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे यात नुकसान असून, बोनस रक्‍कमेत वाढ करण्यासोबतच त्यासंबंधीचे आदेश पारित करण्याची मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com