
ऊस, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार एकट्या नगर जिल्ह्यात यंदा खरिपात ४ लाख ४१ हजार ११९ हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यासाठी २१०० गावांतील सात लाख ४४ हजार ९३८ शेतकऱ्यांना हा फटका बसला असून नुकसानीची मदत देण्यासाठी सुमारे ८७७ कोटी २० लाखाची गरज आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा आहे.
नगर जिल्ह्यात यंदा खरिपात सातत्याने पाऊस, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जून-जुलैमध्ये अल्प नुकसान झाले, मात्र सप्टेंबर आणि आक्टोबर या दोन महिन्यात शेतपीकांची पावसाने अक्षरशः माती झाली. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, कांदा, फळपिके याला जास्ती फटका बसला. आक्टोबरमध्ये सलग पंधरा दिवस पाऊस सुरुच राहिल्याने अधिक फटका बसला. जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून मदत मागितली.
एकट्या नगर जिल्ह्यात तब्बल खरिपात ४ लाख ४१ हजार ११९ हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. २१०० गावांतील सात लाख ४४ हजार ९३८ शेतकऱ्यांना हा फटका बसला असून नवीन निकषानुसार जिरायती क्षेत्रासाठी १३ हजार रुपये, बागायत क्षेत्रासाठी २७ हजार व फळबागांसाठी ३६ हजार रुपये प्रती हेक्टरी नुकसान मदत देण्यासाठी सुमारे ८७७ कोटी २० लाखाची गरज आहे. एका आक्टोबर महिन्यात सुमारे १३८८ गावांत पाच लाख शेतकऱ्यांच्या शेतात ३ लाख पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या महिन्यातील नुकसानीपोटी ५९० कोटी २१ लाख रुपयांची मागणी केली आहे.
सप्टेंबर महिन्यात ७१७ गावांत २ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या शेतात १ लाख ३५ हजार हेक्टरचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मदतीसाठी २८७ कोटीची गरज आहे, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. झालेल्या नुकसानीची मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
...असे आहे नुकसान
एकूण अतिवृष्टी
गावे ५७९
शेतकरी २,७५,०६८
क्षेत्र १,५५,३५४
मदत मिळणार २९० कोटी ९१ लाख
एकूण सतत पाऊस
गावे १५२६
शेतकरी ४,६८,८६२
क्षेत्र २,८५,७६५
मदत मिळणार ५८६ कोटी ३० लाख
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.