Weather Update : कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा `ऑरेंज अलर्ट`?

बहुतांशी भागात पाऊस सक्रीय झालाय. बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढलाय.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणेः बहुतांशी भागात पाऊस (Monsoon Rain) सक्रीय झालाय. बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं काही ठिकाणी नद्यांची पाणीपातळी वाढली. तर हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत काही राज्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी केलाय.

Weather Update
Heavy Rain : मुसळधार पावसाने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. मुसळधार पाऊस सुरू असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांनी पुररेषा ओलांडली. आंबेरी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो एकर भातशेती आणि बागायतीत पुराचे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील बहुतांश मडळांत हलक्या ते मध्यम सरी झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा येथे १०८ मिलिमीटर पाऊस झाला. तर इतर मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या.

Weather Update
Rain Update : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेडला पावसाने झोडपले

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये सोमवारी कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील मंडळात पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबादमधील भावसिंगपूरा मंडळात ७७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालन्यातील जिल्ह्यातील धावडा मंडळात ७४.५ मिलिमीटर तर शेलगाव मंडळात ७६.५ मिलिमीटर पाऊस झाला.जालना जिल्ह्यातील लाहुकी व देवगिरी नदीला पूर आला होता. बीड जिल्ह्यातील बहुतांश मंडळात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलात पावसाने हजेरी लावली.

विदर्भातील बहुतांश मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. बुलडाणा, अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी हलक्या सरी पडल्या. तर काही मंडळांत जोरदार सरी पडल्या. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसानं हजेरी लावली. तर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक होता. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढलाय. सोमवारी या जिल्ह्यांतील अनेक मंडळांत विजांसह जोरदार पाऊस झाला.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदीया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com