शेतकरी विधवा महिलांना मोफत निविष्ठा देणार

नीलम गोऱ्हे यांच्या मागणीला कृषिमंत्र्यांचे आश्‍वासन
शेतकरी विधवा महिलांना मोफत निविष्ठा देणार
Women FarmerAgrowon

पुणे : करोना काळात राज्यात विधवा झालेल्या एकल शेतकरी महिलांना (Widow Women Farmer) त्यांच्या गरजेनुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोफत खते (Free Fertilizer) आणि बियाणे (Free Seed) देण्यासंदर्भात लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.

विधान भवनामध्ये विधान परिषद उपसभापती कार्यालयात शुक्रवारी (ता. २७) डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्याशी त्यांनी गुरुवारी (ता.२६) संवाद साधला. डॉ. गोऱ्हे यांच्या विनंतीवरून कृषिमंत्र्यांनी नीलमताईंची उपसभापती कार्यालयात भेट घेतली.

राज्यातील एकल महिलांना येत्या पावसाळ्यापूर्वी मोफत खते आणि बियाणे देण्याची मागणी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहे. कोविड काळातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील जवळजवळ वीस जिल्ह्यांमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी व कोविड मधील एकल महिलाच्या कुटुंबांवर आलेल्या संकटाचा विचार करता, त्यांना बी-बियाणे आणि खते राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी शुक्रवारी (ता.२७) कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. यावर त्यांनी याबाबत योग्य त्या कार्यवाही करण्याबाबत आश्वासित केले. राज्यातील एकल महिलांना दिलासादायक अशी बाब करण्यास कृषी विभागाने तयारी दर्शविल्याने डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com