एक ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात वन्यजीव जनजागृती

जिल्ह्यातील विविध वनपरीक्षेत्रात १५ जुलैपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
Wildlife
Wildlife Agrowon

पुणे : मानव- वन्यजीव (Wildlife) संघर्ष सोडवण्यासाठी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती (Wildlife Awareness) करण्यासाठी वनविभाग व रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट (Rescue Charitable Trust) बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ‘वन्यजीव जनजागृती कार्यशाळा’ उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली आहे.

Wildlife
ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन; वन्यजीव, जैवविविधता धोक्यात

जिल्ह्यातील विविध वनपरीक्षेत्रात १५ जुलैपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंदापूर, बारामती, पौड, वडगाव मावळ, शिरोता, पुणे, भांबुर्डा विभागांत असणारे महाविद्यालय, शाळा, स्थानिक समुदाय, ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांमध्ये जनजागृतीच्या दृष्टीने दौंड वनपरीक्षेत्रापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

Wildlife
संवर्धन वन्यजीव प्रजातींचे...

दौंड वनपरीक्षेत्रांतर्गत आठवड्याच्या कालावधीत १० शाळा व महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक असे एकूण १ हजार ८४० नागरिकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत रेस्क्यू टीमच्या वतीने विविध प्रजातीच्या प्राण्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नाग, घोणस, फुरसे, मण्यार यांसारख्या विषारी सापांची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली. बिबटप्रवण क्षेत्रात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

अधिकाधिक शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com