
Nashik News : सध्या कांदा दराची (Onion Rate Issue) मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. अपेक्षीत दर मिळावा, ही कांदा उत्पादकांची (Onion Farmer) मागणी रास्त आहे.
त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी कांदा उत्पादकांना दिले.
डॉ. भामरे हे मंगळवारी (ता. २१) मुंजवाड (ता. सटाणा) येथे जलजीवन मिशनच्या (Jaljeevan Mission) कार्यक्रमासाठी आले होते.
त्या वेळी शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत कांदा आणि विजेच्या प्रश्नाबाबत विचारणा केली. दोन वर्षांपूर्वी आवक कमी असताना दर वाढले असताना केंद्र सरकारने निर्यात तातडीने बंद केली; मात्र आता कांद्याचे दर पडले असताना तत्परतेने पावले का उचलत नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी केला.
कांदा उत्पादक या वेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून डॉ. भामरे यांच्या समोर गेले होते. या वेळी भामरे यांनी कांद्याची माळ घालून घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
कांदा उत्पादक अडचणीत आहेत, त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
यावर डॉ. भामरे म्हणाले, की लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन दिले.
सध्या कांदा निर्यात सुरू आहे, ती बंद नाही. कांद्याच्या अनुदानासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. आवक वाढल्याने भाव पडल्याचे त्यांनी सांगितले.
कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा, कांदा निर्यातीस प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. खते व बियाण्यांच्या ७० टक्के किमती कमी कराव्यात, शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी शेतकरी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.