Nitin Gadkari : नाशिकला आयात-निर्यात क्षेत्रात अग्रगण्य करणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्गाच्या २२६ कि.मी प्रकल्पाची कोनशिला अनावरण
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon


नाशिक : जिल्ह्यात झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे रोजगाराच्या नव्या संधी डोकावताना दिसतात. चांगल्या रस्त्यांमुळे हा विकासाचा वेग आणखी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ड्राय पोर्ट हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट असून द्राक्ष, कांदे आणि ऑटोमोबाईल्सच्या क्षेत्रातील निर्यात थेट येथून व्हावी आणि येथेही थेट आयात वाढावी. नाशिकला आयात-निर्यातीच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य ठिकाण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

Nitin Gadkari
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

इगतपुरी येथे रविवारी (ता. १८) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या २२६ की.मी. लांबीच्या १८३० कोटींच्या प्रकल्पांचा कोनशिला अनावरण व लोकार्पण समारंभप्रसंगी मंत्री गडकरी बोलत होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड. माणिकराव कोकाटे, ॲड. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, महंमद खालिद, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाप्रबंधक (तांत्रिक) प्रशांत खोडस्कर, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारण नाशिकचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंखे, इगतपुरी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nitin Gadkari
विदर्भातील शेतीमालाकरिता ‘ॲग्रो एमएसएमई’ क्लस्टर ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

गडकरी म्हणाले, की रोड, रेल्वे आणि ॲव्हिएशन यांचा उपयोग करून आयात-निर्यातीचे प्रमुख केंद्र नाशिकला बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्यावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेची निर्मिती केली गेली. त्याचवेळी मुंबई-नाशिक या हायवेचाही त्याच धर्तीवर विकास करण्याचा मानस होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो त्या वेळी होऊ शकला नसला तरी समृद्धी महामार्ग नाशिकमधून गेल्याने तो मानस पूर्ण होताना दिसतो याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात या रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सप्तश्रृंगी रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा : डॉ. पवार
जिल्ह्यातील रस्ते विकास कामांसाठी केंद्र सरकारमार्फत ५ हजार कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला. श्री. गडकरी यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनातून विकासनशील शहरांसोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांचासुद्धा विकास होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या विकासामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून जिल्ह्यातील कृषी उत्पादन इतर शहरांमध्ये पोहोचण्यासाठी मदत होत आहे. जिल्ह्यात रस्ते विकासासाठी उपलब्‍ध करून दिलेल्या निधीसाठी गडकरी यांचे आभार मानताना डॉ. पवार यांनी नाशिक दिंडोरी येथील सप्तश्रृंगी रस्त्याला राष्ट्रीय
महामार्गाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com