Organic Farming : सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देऊ ः मुख्यमंत्री शिंदे

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला महाराष्ट्रात चालना दिली जात आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला (Organic Farming) महाराष्ट्रात चालना दिली जात आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची (Panjabrao Deshmukh Organic Farming Campaign) स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे (Organic Farming As A Mass movement) स्वरूप देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी राष्ट्रीय नैसर्गिक शेती (Natural Farming) आणि डिजिटल शेती कार्यशाळेत दिली.

Eknath Shinde
Organic Farming : सेंद्रिय शेतीकडील मार्गक्रमण

नवी दिल्ली येथे आयोजित या राष्ट्रीय कार्यशाळेत मुख्यमंत्री शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय रसायन व खतमंत्री मनसुख मांडविया आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री या वेळी उपस्थित होते.

१० लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘राज्यात सुमारे ५.२७ लाख हेक्टर क्षेत्रात प्रमाणित सेंद्रिय शेती केली जाते. राज्यातील आदिवासी भागासह १० लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली येत असून, केंद्राच्या कृषी विकास योजना आणि भारतीय नैसर्गिक शेती प्रणाली योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.

Eknath Shinde
Natural Farming : शेतीसाठी नैसर्गिक पाण्याचा योग्य वापर

कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा यासाठी विज्ञान आधारित सेंद्रिय शेतीसाठी राज्यात प्रयत्न सुरू आहेत. रासायनिक खते आणि कीटकनाशकांशिवाय जमिनीचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे. यामुळे कमी खर्च आणि अधिक फायदेशीर शेती होण्यास मदत होईल त्याचा लहान शेतकऱ्यांना फायदा होईल.’’

६१ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले

राज्यात आतापर्यंत १६२८ शेतकरी गटातील ६१ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना माफक दरात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती प्रमाणित करण्यासाठी राज्य सरकारची स्वतंत्र प्रमाणन संस्था स्थापन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. महाराष्ट्रात डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली असून, त्या माध्यमातून राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहे. नैसर्गिक आणि डिजिटल शेती संदर्भात प्रशिक्षणाची गरज असून, यासाठी मास्टर्स ट्रेनर कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.

ई-पीक पाहणी फायदेशीर

डिजिटल शेतीसाठी प्रयत्न करण्यात येत असून, राज्यातील २ कोटी, २० लाख, ४५ हजार, ९०१ शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख माहितीचे डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. शेतकरी ई-हक प्रणालीवर फेरफार नोंदीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा असून, अर्जाची सद्यःस्थिती ट्रॅक करण्याची सोय असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-पीक पाहणी उपक्रमातून एक कोटी हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान शेतकरी विमा योजनेच्या ऑनलाइन पोर्टलवर १ कोटी १२ लाख शेतकऱ्यांचा डाटाबेस उपलब्ध आहे. जमिनीच्या नोंदीनुसार या डेटाबेसची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया राज्यात सुरू असून, हा डाटाबेस इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com