River Linkage Project : नदी जोड प्रकल्पांना गती देणार ः गजेंद्र सिंह शेखावत

वाजपेयी सरकारने सुरू केलेले नदी जोड प्रकल्प काही कारणाने रेंगाळले होते. त्याला पुन्हा एकदा या सरकारच्या काळात गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
River Linking
River LinkingAgrowon

River Linkage Project पुणे : वाजपेयी सरकारने (Vajpayee Government) सुरू केलेले नदी जोड प्रकल्प (River Linking) काही कारणाने रेंगाळले होते. त्याला पुन्हा एकदा या सरकारच्या काळात गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या काळात जल व्यवस्थापनावर (Water Management) सर्वाधिक आर्थिक गुंतवणूक केली जात असून या सर्व उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendrasingh Shekhawat) यांनी व्यक्त केले.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (एनआययूए) आणि स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियानामार्फत शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाबाबतची धोरणे ठरविणाऱ्या ‘धारा २०२३’ या दोन दिवसीय आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बैठकीचे उद्‌घाटन सोमवारी (ता. १३) करण्यात आले.

River Linking
'Nar-Par, Girna river link' : ‘नार-पार, गिरणा नदीजोड’ला दोन महिन्यांत मान्यता

त्यावेळी श्री. शेखावत बोलत होते. या वेळी जलशक्ती मंत्रालयाच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनचे महासंचालक जी. अशोक कुमार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सचे संचालक हितेश वैद्य, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

आयसीए सदस्यांना शहरी नदी व्यवस्थापनाबाबतच्या प्रत्यक्षात राबविता येतील, अशा विविध उपाययोजना धारा २०२३ मध्ये उपलब्ध होतील.

नद्यांशी संबंधित अभिनव धोरणे आणि शहरी नद्यांचे व्यवस्थापन तंत्र यावर आधारित देशभरातील महत्त्वाच्या उपक्रमांच्या केस स्टडीजची चर्चा होणार आहे.

River Linking
River Linking Project : नदीजोड प्रकल्पातून नांदगावला वगळले

श्री. शेखावत म्हणाले की, कोणत्याही विकास प्रक्रियेत पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र जल व्यवस्थापनाचे हे उपक्रम काही ठराविक शास्रज्ञ व अभियंते आणि पायाभूत प्रकल्पा पुरते मर्यादित न राहता ते सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे.

देशात २३ शहरांपासून सुरू झालेल्या नद्या असलेल्या या संघटनेचे १०७ सदस्य झाले आहेत. पूर्वी नदी आणि जल व्यव स्थापनाची कोणतीही यंत्रणा नव्हती त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आता शहर विकास आणि जल व्यवस्थापन हे दोन्ही विभाग एकत्र येऊन काम करत आहे.

त्याचे परिणाम दिसून येत असून कामाची गती वाढली आहे.पाणी ही सर्वांची मुख्य गरज आहे. ते सर्वांना मिळणे गरजेचे आहे. म्हणून केंद्र सरकार यावर प्रामुख्याने काम करत आहे.

सरकारने १४०० कोटीचा निधी गुंतवत असून पाण्याच्या विविध कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाणी विषयाच्या कामांना गती मिळणार आहे. कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेचे विक्रम कुमार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com