हमीभाव, संपूर्ण कर्जमुक्तीच्या प्रश्‍नावर लढा मजबूत करणार

किसान सभा शेतकरी कष्टकरी वर्गासाठी लढत आहे. हमीभाव, संपूर्ण कर्जमुक्ती, वन जमीन, देवस्थान जमिनींच्या अधिकारासाठी नव्या लढ्याचा निर्धार करा, असे आवाहन अधिवेशनात करण्यात आले.
Kisan Sabha
Kisan SabhaAgrowon

नांदेड : किसान सभा (Kisan Sabha) शेतकरी कष्टकरी वर्गासाठी लढत आहे. हमीभाव (Minimum Support Price), संपूर्ण कर्जमुक्ती (Loan Waive), वन जमीन, देवस्थान जमिनींच्या अधिकारासाठी नव्या लढ्याचा निर्धार करा, असे आवाहन अधिवेशनात करण्यात आले.

Kisan Sabha
MSP : हमीभाव समितीमागे सरकारचा छुपा हेतू

किसान सभेचे दहावे, नांदेड जिल्हा अधिवेशन किनवट येथे उत्साहात झाले. आजादी का अमृत महोत्सव तथा स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्ताने किसान सभेच्या वतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली.

Kisan Sabha
किसान सभा, आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून देणार गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा

अधिवेशनाचे उद्‌घाटन किसान सभेचे नेते कॉ. उमेश देशमुख यांनी केले. या वेळी अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष कॉ. अर्जुन आडे होते. अधिवेशनात अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई द्यावी यांसह अनेक ठराव एक मताने मंजूर करण्यात आले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी तानाजी राठोड, जनार्दन काळे, दिलीप तुमलवाड, शिवाजी किरवले, सचिन जाधव, बाबूराव पवार, स्टॅलीन आडे, संभाजी कागणे, नंदकुमार मोदुकवार, वनिता कागणे आदींनी मेहनत घेतली.

१९ सदस्यीय नूतन कमिटी जाहीर

अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी १९ सदस्यीय नूतन कमिटी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष म्हणून कॉ. शंकर सिडाम यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सदस्यपदी कॉ. किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण, खंडेराव कानडे, शेषराव ढोले, अनिल आडे, आनंद लव्हाळे, राजू पाटील, गंगाधर आरसे, शिवाजी गायकवाड, अडलु बोनगीर, मोहन जाधव, कैलास भरणे, राजू राठोड, अनुसया कुमरे, सुरेखा मेंढके यांची निवड करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com