जादा दराने खते, बियाणे विक्री केल्यास अधिकाऱ्यांना धडा शिकवू

खरीप हंगामातील पेरण्यांना अद्याप पावसाअभावी सार्वत्रिक सुरुवात झालेली नाही.
जादा दराने खते, बियाणे विक्री केल्यास अधिकाऱ्यांना धडा शिकवू

बुलडाणा ः खरीप हंगामातील पेरण्यांना (Kharif Sowing) अद्याप पावसाअभावी सार्वत्रिक सुरुवात झालेली नाही. असे असताना काही ठिकाणी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून (Agriculture Input) अव्वाच्या सव्वा दराने बियाणे (Seed), खते विक्री (Fertilizer Sale), तसेच खतांची लिंकिंग (Fertilizer Leaking) केली जात आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा. तसेच यापुढे कुठेही असे निदर्शनास आल्यास संबंधित जबाबदार कृषी अधिकाऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते धडा शिकवतील, असा इशारा संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी यंत्रणांना दिला.

याबाबत तुपकर यांनी म्हटले, की मॉन्सूनच्या पार्श्‍वभूमीवर पेरणीची कामे सुरू होत आहे. हंगामासाठी शेतकरी बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहेत. अशातच या हंगामात जर शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे, खते दिले जात असेल तर त्याचे मोठे नुकसान होते. हा कारभार कसा चालू शकतो, यामागे निश्‍चितच कृषी विभाग आणि कंपन्यांचे साटेलोटे तर नाही ना अशी शंका येत आहे. कृत्रिम तुटवडा तयार केला जात आहे. निकृष्ट बियाणे बाजारात येते तरी कसा, असा प्रश्‍न हजारो रुपयांचा पगार घेणारी तुमची यंत्रणा काय करते असेही ते म्हणाले.

यंत्रणा जर कारवाई करीत नसेल तर या कंपन्या, अधिकारी, केंद्रचालकांचे साटेलोटे आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. यापुढे आता कुठल्याही कृषी केंद्र चालकाने लिंकिंग करून खत विक्री केली, बोगस बियाणे शेतकऱ्याला दिले तर संबंधित विक्रेत्याला रस्त्यावर आणून स्वाभिमानीचे कार्यकर्ते फटके देतील, असा इशारासुद्धा तुपकर यांनी बोलताना दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com