मॉन्सून खरंच एक जूनला भारतात येणार का?

मागील 25 वर्षांतला इतिहास पाहिल्यावर असे लक्षात येते की, 25 वर्षात केवळ तीनच वेळा 1 जून रोजी मॉन्सून सक्रिय झाला आहे. एवढेच नाही तर मागील 25 वर्षात भारतामध्ये मॉन्सून मे महिन्याच्या शेवटी किंवा 1 जूननंतर सक्रिय झाल्याचे दिसते.
Mansoon In May
Mansoon In MayAgrowon

यंदा 27 मे रोजी मॉन्सून भारतात सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणतः 1 जून रोजी मॉन्सून सक्रिय होईल, असा अंदाज असतो. मात्र यंदा तब्बल पाच दिवस आधी मॉन्सून भारतामध्ये सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील 25 वर्षांतला इतिहास पाहिल्यावर असे लक्षात येते की, 25 वर्षात केवळ तीनच वेळा 1 जून रोजी मॉन्सून (Masoon) सक्रिय झाला आहे. एवढेच नाही तर मागील 25 वर्षात भारतामध्ये (India) मॉन्सून मे महिन्याच्या शेवटी किंवा 1 जूननंतर (June) सक्रिय झाल्याचे दिसते. आणि या दोन्ही परिस्थिती आजवर सर्वाधिक प्रमाणात आलेला आहेत. म्हणजे मेच्या शेवटी आणि 1 जूननंतर मॉन्सून सक्रिय झाल्याचे प्रत्येकी 11 वेळेस घडले आहे. त्यामुळे मॉन्सून नेमका सक्रिय कधी होईल याबाबतची अनिश्चितता चिंतेचा विषय ठरला आहे.

यासंदर्भात 1997-2021 या कालावधीतील मॉन्सूनची वाटचाल पाहिली तर असे दिसते की, 2013, 2016 आणि 2020 या तीन वर्षांमध्ये मॉन्सून1 जून रोजी सक्रिय झाला होता. तर 2000, 2008 आणि 2010 या तीन वर्षात मॉन्सून आगमनाची तारीख 31 मे होती. आणि 2011 आणि 2018 या वर्षी 29 मे रोजी सक्रिय झाला होता. आजवर सर्वात लवकर म्हणजे 26 मे रोजी 2001 आणि 2006 साली भारतात मॉन्सून सक्रिय झाल्याचे दिसते.

तर 2012 आणि 2015 साली मॉन्सून 5 जूनला सक्रिय झाला होता. मागील 25 वर्षात 1997 आणि 2002 वर्षी सर्वात उशिरा म्हणजे 9 जून रोजी मॉन्सून सक्रिय झाला होता. यावरून असे लक्षात येते की, मॉन्सून सर्वात लवकर मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सर्वात उशिरा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात सक्रिय होतो, अशी मागील 25 वर्षातील मॉन्सूनची वाटचाल दिसते.

2002 नंतरचे 2010 हे एकमेव वर्ष आहे, ज्यामध्ये कुठलाही कमी दाबाचा पट्टा संपूर्ण मान्सून काळात निर्माण झाला नाही. सीडीएसपीच्या माहितीनुसार, आजवर सर्वाधिक वेळा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला होता. त्यामुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळ यांचेही प्रमाण अधिक दिसते.

या कमी दाबाच्या पट्ट्याचा आणि चक्रीवादळाचा परिणाम भारतीय मॉन्सूनवर होतो. त्यामुळे मॉन्सूनचे आगामन कधी लवकर तर कधी उशिराने झाल्याचे दिसते. परिणामी पावसाचे प्रमाणसुद्धा दरवर्षी बदलत राहते. कधी जास्त पडतो तर कधी कमी पाऊस पडतो. मागील दहा वर्षामध्ये जून-सप्टेंबर या महिन्यांच्या दरम्यान 900 मीमी पाऊस झाल्याचे सीडीएसपीच्या आकडेवारीवरुन दिसते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com