Weather Update : उद्यापासून पाऊस पुन्हा सुरु होणार?

राज्यात आज पावसाची उघडीप होती. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र पावसाचा जोर कुठेच नव्हता. माॅन्सूननेही आज परतीचा मुक्काम केला.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणेः राज्यात आज पावसाची (Rainfall) उघडीप होती. काही ठिकाणी पावसाचा (Rain Update) शिडकावा झाला. मात्र पावसाचा जोर कुठेच नव्हता. माॅन्सूननेही (Monsoon Update) आज परतीचा मुक्काम केला. तर हवामान विभागानं उद्या मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast With Lightning) व्यक्त केलाय.

माॅन्सूनने काल उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा बहुतांशी भाग, पश्चिम मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तराखंड सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागातून काढता पाय घेतला.

Weather Update
Rain Update : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ४९ मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

मात्र आज माॅन्सूनने त्याच भागात मुक्काम केला. उत्तरकाशी, नजिबाबाद, आग्रा, ग्वालिय, रतलाम, भरूच आणि लाॅंग या भागात माॅन्सूनची सीमा आजही कायम होती. राज्यात आज पावसानं विश्रांती घेतली. राज्याच्या बहुतांशी भागात आज पाऊस नव्हता. मात्र काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

Weather Update
Rain Update : नैताळे परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

तर मध्य महाराष्ट्रातील काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाची भूरभूर सुरु होती. तसचं मराठवाडा आणि विदर्भातही काही मंडळांमध्ये काही वेळ हलक्या सरी पडल्या. मात्र सर्वत्र पावसाचा जोर कमीच होता.

हवामान विभागानं उद्या मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली. तर विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागूपर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com