मंत्रिमंडळ विस्ताराच्या गुंत्यावर मार्ग निघणार?

शिंदे- फडणवीस दिल्लीवारीत पक्षश्रेष्ठींना घालणार गळ
Maharashtra Government
Maharashtra GovernmentAgrowon

मुंबई : सव्वा महिन्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Governmet Cabinet Expansion) मुहूर्त न मिळाल्याने अखेरचा प्रयत्न करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दिल्लीवारीत पक्षश्रेष्ठींना गळ घालणार आहेत. दिल्ली दौऱ्यावर जाण्याआधी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात दीर्घ चर्चा झाली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हेही दिल्लीत दाखल झाले असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या गुंत्यावर मार्ग निघू शकेल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रपती भवनात सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर महाराष्ट्र भवनावर या दोन्ही नेत्यांनी वेळ राखीव ठेवला आहे.

शिवसेनेला भगदाड पाडून भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने मंत्रिमंडळ विस्तार कचाट्यात सापडला. शिंदे गटात शिवसेनेतील अनेक नेते सहभागी झाल्याने त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. या शिवाय दीपक केसरकर, संजय शिरसाट यांच्यासह अनेक आमदारही इच्छुक आहेत.

Maharashtra Government
Crop Damage : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी

मंत्रालयात अधिकारी राज

भाजपमध्ये ज्येष्ठ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे एकूणच सर्व पातळ्यांवर गोंधळ निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना दिले आहेत. त्यामुळे सध्या मंत्रालयात अधिकारी राज सुरू आहे. मंत्रीच नसल्याने सर्व विभागांतील सुनावण्या आणि फायलींचा निपटारा होत नसल्याने कामकाज ठप्प आहे. जवळपास सात हजार कोटींच्या कामांना स्थगिती देऊन राज्याचा कारभारच ठप्प आहे.

Maharashtra Government
Crop Insurance : किसान सभेचे शिष्टमंडळ पीकविम्यासाठी दिल्लीत

मन वळविण्यात फडणवीसांना अपयश

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते. त्यानंतर पुन्हा बैठकीच्या निमित्ताने ते दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा होकार मिळविण्यासाठी अनेक खेटे घातले. मात्र पहिल्या टप्प्यातील दौऱ्यांत त्यांना अपयश आल्याचे बोलले जात आहे. शपथविधीनंतर फडणवीस यांनी अनेक खेटे घातले तरीही दिल्लीतील वातावरण अनुकूल होत नसल्याने भाजप आणि शिंदे गटातील बंडखोरांच्या जिवाला घोर लागला आहे.

अंतरिम निकालाची प्रतीक्षा

सर्वोच्च न्यायालयात लवकर निकाल लागेल, अशी अपेक्षा भाजपला होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन करण्याचे सूतोवाच केल्याने हे प्रकरण दीर्घकाळ लांबेल, असे वाटत आहे. न्यायालयातील शिंदे गटाचा दुबळा प्रतिवाद आणि न्यायालयाच्या नोंदी यामुळे भाजपच्या आणि शिंदे गटाच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे अंतरिम निकालानंतरच मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशा भूमिकेत भाजप पक्षश्रेष्ठी आहेत. तर निकालास विलंब लागेल. त्यामुळे विस्तार करू, असा आग्रह दोन्ही नेत्यांनी धरल्याचे समजते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com