Tur Import: तूर आयातीबाबत धोरण तातडीने मागे घ्या

किसान सभेची केंद्र सरकारकडे मागणी; शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी घटणार
Tur Import News, Agri commodity news
Tur Import News, Agri commodity newsAgrowon

गतवर्षी देशात तुरीचे चांगले उत्पादन (Tur Production) झाले. गरजेच्या तुलनेत ४३ लाख ५० हजार टन तुरीचे उत्पादन झाले असताना तूर आयात (Tur Import) करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र केंद्र सरकारने अशाही परिस्थितीत ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली. परिणामी, तुरीचे भाव कोसळले. गत वर्षी तुरीचा आधारभाव (Tur Rate) ६३०० रुपये असताना शेतकऱ्यांना आधारभावापेक्षा कमी दराने तूर विकावी लागली.

Tur Import News, Agri commodity news
Alamatti Dam : ‘अलमट्टी’ची उंची वाढवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या

भाव कमी मिळत असल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी तूर लागवडीकडे पाठ फिरविणे सुरू केले. परिणामी, या वर्षी तूर उत्पादन गत वर्षाच्या तुलनेत ४३ लाख ५० हजार टनांवरून ३२ ते ३५ लाख टनांपर्यंत खाली येणार आहे. किफायतशीर भाव न मिळाल्याने शेतकरी तूर उत्पादनाकडे पाठ फिरवत असल्याचा हा परिणाम आहे.

Tur Import News, Agri commodity news
Tur Import : तूर आयातीसाठी सरकारची धडपड

देश परावलंबी होईल ः नवले
केंद्र सरकारने तूर आयातीचे हे धोरण पुढेही असेच सुरू ठेवले तर देश तूर उत्पादनासाठी कायमचा परावलंबी होईल असा आरोप ही किसान सभेने केला आहे. तुरीचा वाढता उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना तुरीसाठी किमान ९००० रुपये भाव मिळेल अशी धोरणे घ्यावीत, अशी मागणी किसान सभेकडून करण्यात आली असल्याची माहिती किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com