आधार लिंक करून सात लाख रुपये काढले

बँक खात्यास विनापरवानगी आधारकार्ड लिंक करून खात्यातून सहा लाख ८० हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले.
aadhar link
aadhar linkAgrowon

नगर ः बँक खात्यास विनापरवानगी आधारकार्ड लिंक (Aadhar Link) करून खात्यातून सहा लाख ८० हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. कुंभारवाडी (ता. संगमनेर) येथील शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. १८ जून २०२२ ते २० ऑक्टोबर २०२२ दरम्यान ही घटना घडली. शेतकऱ्याच्या फिर्यादीरून सायबर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्याचे कुंभारवाडी येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत खाते आहे. त्यांच्या या खात्यावर रक्कम होती. त्यांनी त्यांच्या बँक खात्याचा कोणताही तपशील इतर कोणालाही दिलेला नव्हता. त्यांनी कोणताही ओटीपी संबंधी माहिती दिलेली नव्हती, असे असतानाही १८ जून ते २० ऑक्टोबर दरम्यान अज्ञात व्यक्तीने विनापरवानगी त्यांच्या बँक खात्यास एक आधार नंबर लिंक केला. त्याव्दारे बँक खात्यातून विनापरवानगी परस्पर सहा लाख ८० हजार रुपयांची रक्कम काढली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com