संविधानाशिवाय तिरंगा अभियान अपूर्ण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना निश्चितपणे प्रत्येक घरी तिरंगा लावलाच पाहिजे. परंतु भारतीय संविधानदेखील आपल्या सर्वांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे.
Har Ghar Tiranga
Har Ghar TirangaAgrowon

पुणे ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना निश्चितपणे प्रत्येक घरी तिरंगा लावलाच पाहिजे. परंतु भारतीय संविधानदेखील आपल्या सर्वांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेली ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा ‘हर घर संविधाना’शिवाय अपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले.

Har Ghar Tiranga
Cotton Sowing: अतिसघन कापूस लागवड तंत्र कसं आहे ?

सोमवारी (ता. ८) पुणे बाजार समितीमधील बाजार आवारातील सर्व कामगार घटकांची बैठक डॉ. आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, सचिव विशाल केकाणे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले, माजी अध्यक्ष विलास भुजबळ, हमाल पंचायतीचे गोरख मेंगडे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, राजेश मोहोळ, हनुमंत बहिरट, महात्मा फुले कामगार संघटनेचे राजू पवार आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. आढाव म्हणाले, ‘‘सध्या सुरू असलेला दांभिक राष्ट्रवाद, धार्मिक ध्रुवीकरण लोकशाहीची गळचेपी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने देशासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत आपण शांत राहणे म्हणजे एक प्रकारे जे काही चालले आहे, त्याला मुकसंमती देण्यासारखे आहे. हर घर तिरंगा ठिक आहे. पण संविधानाशिवाय तिरंगा अभियान पूर्ण होऊ शकत नाही. केंद्र सरकारच्या विरोधात विविध समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन (ता.९) ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘जन की बात हर घर संविधान’या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com