Kharif Sowing : दुसऱ्यांदा पेरणीसाठी कर्जाशिवाय नाही पर्याय

हवामान खात्याने वर्तविलेला १०० टक्के पावसाचा अंदाज चुकीचा ठरला, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. जून महिन्यात कधी उन्हाचा तडाखा तर कधी ढगाळ वातावरण असेच चित्र राहिले.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

सांगली ः ‘‘उडदाची (Black Gram) अडीच एकरांवर पेरणी (Sowing) केलीया. पाऊस लांबणीवर (Rain Delay) पडलाया. पेरणी केलेलं पीक डोळ्यादेखत वाळून चाललंया. एका पेरणीसाठी होता तेवढा पैसा घातला. आता दुसऱ्यांदा पेरणी करायची म्हटंल तर कर्ज घेतल्याशिवाय (Crop Loan) पर्याय नाही,’’ अशी व्यथा जत तालुक्यातील डफळापूर येथील शेतकऱ्यांनी मांडली.

हवामान खात्याने वर्तविलेला १०० टक्के पावसाचा अंदाज चुकीचा ठरला, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. जून महिन्यात कधी उन्हाचा तडाखा तर कधी ढगाळ वातावरण असेच चित्र राहिले. अशा वातावरणात सुद्धा जिल्ह्यात खरिपाचा पेरा सुरू झाला. दुष्काळी पट्ट्यासह बागायती पट्ट्यांमध्ये सोयाबीन, भात, उडीद, मूग अशा पिकांची पेरणी झाली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी एकरी पाच ते दहा हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. आता पावसाने दडी मारली आहे.

Kharif Sowing
Kharip Sowing: राज्यभरात फक्त १३ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी

बागायती भागातील म्हणजे वाळवा, पलूस, कडेगाव, मिरजच्या पश्चिम भागातील शेतकरी विहिरी, कूपनलिकांद्वारे पिकांना पाणी देत आहेत. परंतु पाण्याची पातळी खालावली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मे महिन्यामध्ये वळीव पाऊस पडतो. मात्र वळीव पाऊस झालाच नाही. तर दुसरीकडे म्हणजे जत, तासगाव, खानापूर तालुक्यांत पेरणी केलेल्या पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेले पीक अति पाण्यामुळे कुजून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा राहिला नाही.

खर्चात वाढ अन् उत्पन्नाचा बेभरवसा

दरम्यान, यंदा बियाणे, खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांचे गणित विस्कळित झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी हात उसने पैसे घेऊन पिकांची पेरणी केली. आता पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी केलेली पिके वाया जाण्याची भीती आहे. अगोदरच पेरणीला केलेला खर्च, त्यात आता दुबार पेरणी करायला लागणार असल्याने पुन्हा खर्चात वाढ होणार आहे. पेरणी करायची झाली तर पैसा कुठून आणायचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यांच्यासमोर दुसऱ्यांदा पेरणीसाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही.

अडीच एकरांवर उडदाची पेरणी केली. पावसानं ओढ दिल्यामुळे पीक वाळू लागले आहे. दुबार पेरणी करायची म्हटलं तर दुसऱ्यांदा कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही.
संजय माळी, डफळापूर, ता. जत, जि. सांगली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com