हिरकणी उद्योग समूहाकडून महिलांची फसवणूक

हिरकणी व्यवसाय प्रशिक्षण व महिला उद्योग समूहाच्या नावाखाली संपूर्ण राज्यात महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करीत कंपनीने पोबारा केला आहे.
Fraud
FraudAgrowon

रिसोड, जि. वाशीम ः हिरकणी व्यवसाय प्रशिक्षण व महिला उद्योग समूहाच्या (Hirakani Udyog Samuh) नावाखाली संपूर्ण राज्यात महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud) करीत कंपनीने पोबारा केला आहे. या कंपनीने वाशीम जिल्ह्यातील महिलांची ३७ लाखांनी फसवणूक केली आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या तालुका व जिल्हा समन्वयकांनी शेकडो महिलांची फसवणूक केल्याची तक्रार २९ ऑगस्टला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

Fraud
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे मुख्यालय दाखवलेल्या या हिरकणी व्यवसाय प्रशिक्षण व महिला उद्योग समूहाने काही दिवसांपूर्वी नागपूर येथे विभागीय कार्यालय उघडले. त्यानंतर तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयक यांना हाताशी धरून विविध जिल्ह्यात जाळे टाकले. वाशीम जिल्ह्यातही महिलांकडून रोजगार व प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली प्रत्येक महिलेकडून ६२० रुपये शुल्क गोळा केले.

महिलांना गृहउद्योग उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. महिला सभासदांची संख्या जास्त व्हावी या हेतूने सभासद नोंदणीनुसार कमिशन देण्याचे ठरले. त्यामुळे प्रत्येकी सहाशे वीस रुपयांप्रमाणे प्रशिक्षण शुल्क म्हणून वसूल करण्यात आले. या माध्यमातून वाशीम जिल्ह्यामधून महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. महिलांकडे पाठवलेला माल परत घेतला नाही. नंतरच्या काळात फसवणूक झालेल्या महिलांना कुठलाही प्रतिसाद कंपनीकडून दिल्या जात नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com