Women Empowerment : आत्मनिर्भरतेसाठी महिलांनी विविध कौशल्ये शिकावीत

आत्मनिर्भर होण्यासाठी महिलांनी विविध कौशल्य आत्मसात करावीत असे मत ‘बामू’च्या सिनेट सदस्य डॉ. योगिता तौर-होके पाटील यांनी व्यक्त केले.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon

औरंगाबाद : आत्मनिर्भर (Atmnirbhar) होण्यासाठी महिलांनी (Women Empowerment) विविध कौशल्य आत्मसात करावीत असे मत ‘बामू’च्या सिनेट सदस्य डॉ. योगिता तौर-होके पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामविकास संस्था व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबादतर्फे श्रीकृष्ण नगरी देवळाई येथे आयोजित महिला टेलरिंग प्रशिक्षण (Women Tailoring Training) कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी उद्‍घाटक म्हणून त्या बोलत होत्या.

Women Empowerment
Women Empowerment : महिला विकास निधीतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण

या प्रसंगी ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे, हरिभाऊ हिवाळे, ‘एमजीव्हीएस’चे सचिव अप्पासाहेब उगले उपस्थित होते. तौर म्हणाल्या, की स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्या प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे कौशल्य असण्याची गरज आहे.

Women Empowerment
Women Empowerment : राष्ट्र विकासासाठी महिला सक्षमीकरण आवश्यक

ही काळाची गरज ओळखून ग्रामविकास संस्थेच्या पुढाकाराने हे टेलरिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. देवळाई परिसरातील महिलांनी या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा व आत्मनिर्भर व्हावे.’’ शिवपुरे म्हणाले, ‘‘ग्रामविकास संस्थेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त ‘आत्मनिर्भर महिला अभियान’ राबविण्यात येते आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त देवळाईतील गरजू महिलांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातील प्रत्येक महिला स्वावलंबी झाली पाहिजे, याकरिता टेलरिंग प्रशिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, स्वयंरोजगाराच्या संधी, अभ्यास सहल, मार्केटिंगबाबतही प्रशिक्षण देण्यात येईल.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com