Self Help Group : महिला बचत गटाची मॉलमध्ये दमदार एन्ट्री

महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार विविध वस्तूंची मॉलमध्ये विक्री करण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे.
Super Market
Super MarketAgrowon

अमरावती : येथील रिलायन्स मॉलमध्ये (Relience Mall) महिला बचत गटाच्या (Women Self Help Group) स्टॉलला मान्यता मिळाली. या महिला बचतगटाच्या स्टॉलचे उद्घाटन मुख्य समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजेश मिरगे, रिलायन्सचे व्यवस्थापक चंद्रशेखर गोतमारे, प्रा. शोभना देशमुख, जिल्हा समन्वयक सुषमा बर्वे, आशा गोटे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

Super Market
Group Farming : ‘कृषी क्रांती’ घडविण्यासाठी कंपनीची पाऊलवाट

महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार विविध वस्तूंची मॉलमध्ये विक्री करण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. शनिवार व रविवार, असे दोन दिवस बचतगट आपले साहित्य विक्री करू शकणार आहे.

Super Market
Womens Self-Help Group : नागपुरात होणार महिला बचत गटाचे दोन मॉल

कार्यक्रमाला अ‍ॅड. सपना विधळे, प्रतिभा तायडे, जयश्री वानखडे, उद्योजिका रेखा पांडव, अलका कोकाटे, वर्षा कावरे, रूपाली राणे, मंजू ठाकरे, नेहा गुळदे, मंजूषा पाथरे, अलका राऊत, नेत्रा जोशी यांच्यासह गायत्री महिला बचतगट, अन्वेज गृहोद्योग, प्रगती बचतगट, आशीर्वाद बचत गट, नमो सहायक बचतगटाच्या सदस्य प्रामुख्याने उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील महिलांना उद्योगाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिला आर्थिकदृष्टीने सक्षम होत असून उद्योग जगतात भरारी घेत आहे.

- सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com